संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या माजी नगरपरिषद सदस्यांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपलेला असून 12 फेब्रुवारी 2022 पासून प्रशासक कारभार सुरू आहे.मात्र प्रभागातील माजी नगरसेवक हे अजूनही स्वतःला नगरसेवक गृहीत धरून लोकसेवकाची भूमिका साकारून राजकीय पोळी शेकत आहे परिणामी भविष्यात नगरसेवक बनण्याची इच्छा बाळगून बसलेल्या इच्छुकांना तोंडघशी पळण्याची वेळ आली आहे. तेव्हा या लोकशाहीत अश्या प्रकाराला आळा बसावा व नगर परिषद मध्ये असलेल्या प्रशासक पदाचा कारभार सुरळीत राहावा या मुख्य उद्देशाने तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या त्यांच्या तक्रारी व स्वच्छतेची कामे होतात की नाही हे पाहण्यासाठी प्रभागनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून 31 प्रभागासाठी 8 नोडल अधिकाऱ्यांना सहाय्यक अधिकारी म्हणून त्यांना नेमून दिलेल्या प्रभागातील समस्या सोडविण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे.
प्रभागनिहाय नेमलेल्या या 8 नोडल अधिकाऱ्यांमध्ये प्रभाग क्र 1,2,3,5,27 साठी मसूद अख्तर(मो नं 8888909703), प्रभाग क्र 4,6,8,19,20 साठी गंगाधर मेहर(9637369889), प्रभाग क्र 7,9,10,11,12 साठी दीपक जैस्वाल(8806297460), प्रभाग क्र 13,15, 16, 17,18 साठी रुपेश जैस्वाल(8830198720), प्रभाग क्र 14 साठी राकेश दमके (9823436836), प्रभाग क्र 21, 22,23,24,25 साठी अकशीश मलिक (9834445079), प्रभाग क्र 26,28,29,30 साठी विकास धामती (8999799479)तर प्रभाग क्र 31 साठी प्रदीप भोकरे (9657777125) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांची स्वच्छता व नालेसफाई याबाबत कायम ओरड असते.प्रभागात स्वच्छता नियमित होत आहे की नाही हे पाहण्यासोबतच नागरिकांच्या नागरी समस्या सोडविण्याची जवाबदारी या नोडल अधिकाऱ्यावर राहणार आहे त्यामुळे नागरिकांना नागरी समस्येसंदर्भात नगर परिषद प्रशासनाशी संपर्क साधावे लागणार आहे.तर या नोडल अधिकाऱ्यांना प्रभागातील स्वच्छता,नालेसफाई ,कर्मचाऱ्यांची उपस्थिती आदींवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.विशेष म्हणजे नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांची नावे व फोन नंबर सार्वजनिक करण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधुन माहिती द्यावी लागणार आहे.