नागपूर :- ऑफिसर्स क्लब येथील विविध विकास कामांसोबतच क्रिडा संबंधित नुतनीकरण व दुरुस्ती करण्यासाठी डिझाइन व बांधकामासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंटची नेमणुक करण्यात येणार आहे. शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये नोंदणीकृत प्रोजक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट यांनी दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन वेळात दरपत्रक सादर करावे, असे आवाहन पुर्नवसन उपायुक्त तथा ऑफिसlर्स क्ल्बचे सचिव प्रदीप कुळकर्णी यांनी केले आहे.