मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

– नागपूर विभागातून २४ हजार ७६० अर्ज

नागपूर :- राज्य शासनाने ६५ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री वयोश्री’ या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत नागपूर विभागातून जास्तीत-जास्त पात्र जेष्ठ नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.आतापर्यंत या योजनेंतर्गत विभागात २४ हजार ७६० अर्ज प्राप्त झाले आहेत.

दैनंदिन आयुष्यात जेष्ठ नागरिकांना सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अंतगत्व, अशक्तपणावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य, साधने खरेदी करण्याकरिता तसेच मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधीत ठेवण्यासाठी, प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेंतर्गत एकवेळ एकरकमी रुपये ३ हजार लाभार्थ्यांच्या बचत खात्यात थेट वितरीत करण्यात येते.

नागपूर विभागात या योजनेंतर्गत १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत एकूण २४ हजार ७६० अर्ज प्राप्त झाले असून यात सार्वधिक ९ हजार ८५० अर्ज भंडारा जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत.

यापैकी नागपूर जिल्ह्यात १ हजार ४०६, वर्धा ४ हजार ९००,गोंदिया २८९, चंद्रपूर ३ हजार ९४ आणि गडचिरोली जिल्ह्यातून ५ हजार २२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन डॉ. गायकवाड यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत पात्र जेष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाईकल कॉलर खरेदी करता येतील. राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगा उपचार केंद्र, मन:स्वास्थ्य केंद्र, मन:शांती केंद्र ,प्रशिक्षण केंद्र येथे जेष्ठांना सहभागी होता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, आधार कार्ड असलेल्या व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयाच्या आत असलेल्या जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड, योजनेची अंमलबजावणी व देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नागपूर या कार्यालयासोबतच जिल्ह्यांच्या सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास संपर्क साधता येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राचीन श्री शिव मंदिर पहुंची कावड़ यात्रा

Thu Aug 15 , 2024
नागपुर :- सावन मास में कावड़ यात्रा का बहुत महत्व है। श्रद्धालु पवित्र नदियों से जल भरकर पैदल चलकर भगवान भोलेनाथ के मंदिर पहुंचकर भोले बाबा को जलाभिषेक करते है। श्रद्धालु हरिद्वार से गंगा जल भर कर देवघर में भोले बाबा के शिवलिंग पर चढ़ाते है। लेकिन जो लोग इतनी दूर नहीं जा सकते वे अपने घर के आस पास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!