भंडारा :- भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये जिल्ह्यात 1 ऑगस्ट 2022 पासून मतदार कार्ड सोबत आधार कार्ड जोडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 10 लाख 14 हजार 330 मतदार असून त्यापैकी 6 लाख 56 हजार 331 मतदारांनी मतदार कार्ड सोबत आधार कार्ड जोडणी केली आहे.
3 व 4 डिसेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व 1 हजार 205 मतदान केंद्रावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी जास्तीत जास्त मतदारांनी नमुना 6 ब भरुन आधार कार्ड मतदार ओळखपत्रासोबत जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.