येरखेडयात डेंग्यूचा दुसरा बळी..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

डेंग्यूसदृश्य आजाराने महिलेचा मृत्यु

कामठी ता प्र 27:-कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानल्या जाणाऱ्या येरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील न्यू येरखेडा येथील वॉर्ड क्र चार रहिवासी सतीश पाटील नामक 34 वर्षीय अविवाहित तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाल्याची घटना 19 ऑगस्ट ला पहाटे पाच दरम्यान घडली असता या घटनेला वीराम मिळत नाही तोच आज सायंकाळी 7 दरम्यान 15 ऑगस्ट ला प्रसूती झालेल्या 21 वर्षीय महिलेचा नागपूर येथील आयुष्यमान हॉस्पिटल येथे उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतक महिलेचे नाव प्रियंका भवते वय 21 वर्षे रा वार्ड क्र 2 येरखेडा असे आहे. सर्वत्र डेंग्यूची दहशत निर्माण झाली असुन मागील आठ दिवसात येरखेड्यात डेंग्यूने दोघांचा बळी गेला आहे.

कामठी तालुक्यात सर्वत्र पसरलेल्या आय फ्लूचा प्रकोप कमी होत नाही तोच आता डेंग्यू या आजाराने थैमान घातल्याने सर्वत्र चिंतेचा विषय बनला आहे.

सदर मृतक महिलेची 15 ऑगस्ट ला प्रसूती झाल्यानंतर त्या महिलेला ताप आल्यानंतर तडकाफडकी नागपूर च्या आयुष्यमान हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले तर उपचार दरम्यान या महिलेचा तडकाफडकी मृत्यू झाल्याने सर्वाना एकच धक्का बसला. या घटनेने येरखेड्यात शोककळा पसरली असून वाढत्या डेंग्यूचा प्रकोप लक्षात घेता येरखेडा ग्रा प प्रशासनाने गांम्भोर्याची भूमिका घेत परिसरात किटकजन्य ब्लिचिंग पावडर मारण्यासह धूळ फवारणी मोहीम युद्ध पातळीवर राबवावी अशी मागणी येथील सुज्ञ नागरिक करोत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र दूध उत्पादक विक्रेता सघटनेकडून दूध भाव वाढ, कुत्रिम दुधाची विक्री जोमात.

Mon Aug 28 , 2023
यवतमाळ :-महाराष्ट्र दूध उत्पादक विक्रेता सघटनेकडून दूध भाव वाढ करण्यात आली हि दर वाढ १ ऑगस्ट २०२३ पासून करण्यात आली आहे दूध उत्पादकांना नुकत्याच घेतलेल्या सभेत, ६४ रुपये विक्री करण्याचे ठरविण्यात आले हि सभा श्री कृष्ण मंदिर टिळक वाडी यवतमाळ येथे सभेत जाहीर करण्यात आली या दूध उत्पादक संघटनेच्या अध्यक्ष स्थानी  रामेश्वर यादव हे होते तर प्रमुख प्रकाश लंगोटे, वेंकटराव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com