संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
पारशिवनी – पारशिवनी तालुक्यातील पालोरा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हजरत बाबा खाॅकशाहवली चाॅदशाहवली रहैमतुल्ला अल दरगाह सालाना उर्सचे आयोजन 28 फेब्रुवारीला करण्याचे ठरविलेले आहे.
ह्या उर्सनिमीत्य संदलचे आयोजन करण्यात आले आहे. हे संदल पालोरा येथील दर्ग्यावरून पारशिवनी शहरात गस्त करीत बाजार चौक येथुन पुन्हा पालोरा येथे जाणार आहे. या उर्स मध्ये जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन हजरत बाबा खाॅकशाहवली चाॅदशाहवली रहैमतुल्ला अल दरगाह कमेटीने केलेले आहे. या उर्स मध्ये हिंदु व मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यावेळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आलेले आहे.