राज्यपालांच्या उपस्थितीत सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची वार्षिक परेड संपन्न

मुंबई :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी (दि.१२) एनसीपीए मुंबई येथून सैन्य दलातील शौर्य पदांनी विभूषित अधिकारी व जवानांच्या वार्षिक संचलनाला झेंडी दाखवून रवाना केले.

त्यानंतर, ‘परेड ऑफ व्हेटरन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संचलनात स्वतः सहभागी होऊन राज्यपालांनी सेवानिवृत्त अधिकारी, माजी सैनिक, वीर नारी व त्यांच्या कुटुंबियांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

राज्यपालांनी सुरुवातीला व्हीलचेअरमध्ये बसून आलेल्या वरिष्ठ सेवानिवृत्त सैनिक अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना अभिवादन केले. त्यानंतर शेकडो युवक व नागरिकांच्या ‘वंदे मातरम’ च्या जयघोषात त्यांनी माजी सैनिक अधिकाऱ्यांच्या संचालनासोबत चालून माजी सैनिकांप्रती आपली सद्भावना प्रकट केली.

‘परेड ऑफ व्हेटरन्स’चे आयोजन नेव्ही फाउंडेशनच्या मुंबई शाखेतर्फे नेव्हीच्या पश्चिम विभाग मुख्यालयाच्या सहकार्याने केले होते.

यावेळी नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जसजीत सिंह, नेव्ही फाउंडेशन मुंबई विभागाचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्रातील भाजपाचा महाविजय देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणारा! - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

Mon Jan 13 , 2025
शिर्डी :- काही निवडणुका देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणाऱ्या असतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हा महाविजय देशाच्या राजकारणास नवी दिशा देणारा ठरणार असून याची इतिहासात नोंद होणार आहे. पक्षाचे समर्पित कार्यकर्ते हे या महाविजयाचे खरे शिल्पकार आहेत. या देशात सिद्धान्ताची राजनीतीच चालेल हे दाखवून परिवारवादी राजकारणास महाराष्ट्राने जोरदार चपराक लगावली आहे. महाराष्ट्रातील हा महाविजय म्हणजे कार्यकर्त्यांचे समर्पण आणि मेहनतीचे फळ असून यापुढेही भाजपाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!