भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा

नवीन कार्यकारिणीमध्ये १२ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, १४ चिटणीसांचा समावेश

मुंबई :- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मोर्चाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष ,८ सरचिटणीस, १४ चिटणीस आणि कोषाध्यक्ष यांचा समावेश आहे.

उपाध्यक्षपदी प्रा. वर्षा भोसले, वैशाली चोपडे, गिता कोंडेवार, लता देशमुख, मंगल वाघ, आम्रपाली साळवे, रितू तावडे, शौमिका महाडिक, कांचन कूल, अॅड. अलका जांभेकर, स्वाती भामरे, जयश्री अहिरराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी मंजुषा कुद्रीमोती, छाया देवांग,स्वाती शिंदे, मीना मिसाळ, रेखा हाके, अलका अत्राम, रश्मी जाधव, रचना गहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीसपदी नयना वसानी, अपर्णा पाटील, रुपाली कचरे, सुनिशा शहा, अर्चना वडनाल, क्षमा चौकसे, शुभदा नायक, गिता गिल्डा, रेखा वर्मा, अॅड. विणा सोनवलकर, रेखा डोळस, रेश्मा शेख, माधुरी पालवे, तृप्ती मामले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोषाध्यक्षपदी भारती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्च्याच्या नवीन पदाधिकारी संघटनात्मक कार्य चांगल्याप्रकारे करतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे. तसेच उर्वरीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येतील, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Swiss Ambassador Dr Ralf Heckner meets Maharashtra Governor

Wed May 31 , 2023
Says Switzerland will create Innovation Platform for businesses, universities Mumbai :-Stating that 330 Swiss companies are working in India, with half the companies operating in Maharashtra, the Ambassador of Switzerland to India Dr Ralf Heckner said the country is contemplating on creating an ‘Innovation Platform’ where businesses and universities will work together. He said such platform will have premier institutions […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com