मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर मंगळवार दि. 29, बुधवार दि. 30, गुरुवार दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.
शाश्वत उत्पन्नाची हमी देणारा व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय केला जात आहे. या माध्यमातून चांगला रोजगार मिळत आहे. मात्र, राज्यातील काही भागात लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पशुपालकांनी पशुधनाची कशी काळजी घ्यावी, लम्पी साथरोगाचा प्रादुर्भाव कसा रोखावा त्याचबरोबर राज्य शासन कोणत्या उपाययोजना करीत आहे, अशा विविध विषयांची माहिती, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. वसेकर यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक दिशा जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.