संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना व शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी विविध दाखले काढण्यास तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे.मात्र या सेतू केंद्रातून 2 जुलै पासून उत्पन्नाचे दाखले अडकले असून तंत्रिकीय अडचण असल्याचे सांगून अर्जदारांना आल्यापायी उलटपायी पाठवतात त्यातच काहींना हाताशी धरून कुठलेही तंत्रिकीय कारण न सांगता सहजरित्या दाखले देण्याचा प्रकार सुरू असल्याने दाखल्यासाठी येणाऱ्या लाडक्या बहिणीसह विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे .यासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून विचारणा केली असता सेतू केंद्रातील कर्मचारी उर्मट पनाने वागतात त्यामुळे सेतू केंद्रातील हा प्रकार मनमाणीपणा व एकाधिकारशाही चा असून एकीकडे राज्य शासनाने लागू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून कुणीही लाभार्थी वंचीत राहू नये यासाठी शासन कटिबद्ध आहे मात्र प्रशासनातील एक भाग असलेला सेतू केंद्रातील हा प्रकार शासनाच्या योजनेलाच हरताळ फासणारा आहे तर प्रशासकीय यंत्रणेकडूनच शासनाच्या योजनेला खो देण्याचा प्रकार असल्याचे मत माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
राज्य सरकारने 1 जुलै पासून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कार्यान्वित केल्याने कामठी तहसील कार्यालयात उत्पन्नाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्रासाठी महिलांची झुंबड लागली आहे.महा ऑनलाईन च्या साईटवर भार पडल्याने सेतू केंद्रातील साईट वर भार पडल्याने सेतू केंद्रातील साईट वर अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांना विविध प्रवेशासाठी तसेच शिष्यवृत्तीसाठी जात,उत्पन्न,रहिवासी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची आवश्यकता भासल्याने ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.मात्र सेतू केंद्रातील मनमाणीपणामुळे अर्जदार तसेच विद्यार्थ्यांना 15 दिवस लोटूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यापासून वंचीत राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.मात्र सेतू केंद्रातून सुरू असलेल्या भोंगळ कारभारातून कागदपत्रासाठी आलेल्या काही अर्जदारांना तंत्रिकीय कारण सांगून आल्यापायी परत पाठवतात तर काहींना हाताशी धरून कुठलेही कारण न दर्शविता सहजरित्या या सेतू केंद्रातून दाखले देण्याचा प्रकार सुरू आहे.
तेव्हा या सेतू केंद्रातून कर्मचाऱ्यांची इतरत्र दुसऱ्या विभागात बदली करावी अशी मागणी जी प सदस्य अनिल निधान यांनी केली आहे.