प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश  

– माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांचाही भाजपा प्रवेश

– प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

मुंबई :- प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी शनिवारी आपल्या सहकाऱ्यासह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गावंडे यांचे स्वागत करत त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.विक्रांत पाटील, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. गावंडे यांच्या प्रवेशामुळे अकोल्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यातील माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी व कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सई डहाके यांनीही राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केला.

बावनकुळे म्हणाले की, प्रहारचे प्रदेशाध्यक्ष गावंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपाचे नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास दाखवत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना,विकासकार्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी गावंडे प्रयत्न करतील.आ.कुटे यांच्या पुढाकाराने गावंडे यांच्यासारख्या समर्थ नेतृत्वाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात गावंडे यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहून त्यांचा यथोचित सन्मान राखेल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

गावंडे म्हणाले की,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांच्या आणि स्थानिक समस्या सोडवण्याचा शब्द दिला,त्यांच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेवून शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण भाजपा मध्ये प्रवेश करत आहोत.पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असेही ते म्हणाले.

वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपा निषेध करत असून अशा प्रकारचे वक्तव्य कदापि खपवून घेणार नाही असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.पक्षातर्फे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. देशमुख यांच्यावर पोलीसांनी,महिला आयोगाने कडक कारवाई करावी अशी मागणीही बावनकुळे यांनी केली. देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा गैरफायदा घेऊन कुणीही सुजय विखे पाटील यांची नाहक बदनामी करू नये. सुजय यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या विरोधी पक्षांच्या हल्लेखोरांवर पोलीसांनी कडक कारवाई करावी, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ नागरिकांनी “राष्ट्रासाठी एक तास” द्यावा - अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर

Sat Oct 26 , 2024
– स्वीप अंतर्गत मनपात ज्येष्ठ नागरिक संघटनांची बैठक   नागपूर :- विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या मनात आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रती जागृती निर्माण व्हावी याकरिता ज्येष्ठ नागरिकांनी राष्ट्रासाठी एक तास देत, मतदारांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्याच्या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा स्वीपचे नोडल अधिकारी अजय चारठाणकर यांनी केले. सिस्टिमेटिक व्होटर्स एज्यूकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टीसिपेशन अर्थात ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com