नागपूर :- गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल नागपुर जिल्ह्याच्या वतीने पक्ष प्रमुख शरदचंद्र पवार यांच्या अशीर्वादाने प्रदेश अध्यक्ष राज राजपुरकर व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहर जिल्हा अध्यक्ष रुपेश बांगडे यांच्या नेतृत्वात सुरेश घोड़े (शहर उपाध्यक्ष नागपुर ) सकलैन खान (उत्तर नागपुर विधानसभा अध्यक्ष ) दत्तकुमार सोनवाने (महासचिव दक्षिण-पश्चिम विधानसभा) सूरज जुआर (उपाध्यक्ष पूर्व नागपुर) (पूर्व नागपूर अध्यक्ष पंकज निबर्ते ) (दक्षिण पश्चिम विधानसभा अध्यक्ष चेतन मस्के, ) प्रसिध्दी प्रमुख नागपूर शहरचे जयेश चंदनकर यांचीही नियुकी करण्यात आली. तसेच यापूर्वी नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी अनिल देशमुख यांनी नागपुर जिल्ह्यातील ओबीसी सेल तर्फे सुरु असलेल्या कार्याची स्तुती केली व भविष्यात सेल च्या पदाधिकारी यांना महत्वाच्या जबाबदारी देण्यात येईल. व समाजाच्या न्याय हिताच्या लढाईत संपुर्ण पक्षाची ताकत देण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांची उपस्थिती होती व विदर्भ अध्यक्ष रमण ठवकर, प्रदेश सचिव नत्थूजी दारोटे, तसेच राहुल पराते, लांजेवार, गंगाराम ढोबले, सोमेश्वर बावनकुळे, हर्षल खडतकर व समस्त सेल चे पदाधिकारी गण उपस्थित होते.
अनिल देशमुख यांनी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांची केली स्तुती व सत्कारही केले
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com