टिपेश्वरच्या वेशीवरील अंधारवाडी आदिवासी गाव झाले ‘मधाचे गाव’

Ø 25 कुटुंबात प्रत्यक्ष मध निर्मितीस सुरुवात

Ø प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांची संकल्पना

Ø टिपेश्वरच्या पर्यटकांना मधाच्या गावाची भुरळ

यवतमाळ :- शासनाच्यावतीने आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून टिपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर असलेल्या अंधारवाडी या आदिवासी गावात आगळावेगळा उपक्रम साकारण्यात आला आहे. हे संपुर्ण गावच ‘मधाचे गाव’ करण्यात आले असून मध विक्रीतून या गावात समृध्दी येणार आहे.

शासनाच्यावतीने मधाचे गाव ही योजना सुरु करण्यात आली आहे. आदिवासी समाज जंगालांवर प्रेम करणारा रानावनात राहणारा समाज आहे. मध संकलनाचे प्रशिक्षण देऊन त्यांना या व्यवसायातून आर्थिक समृध्दीकडे नेता येऊ शकते, या उद्देशाने पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी खादी व ग्रामोद्योग विभागाच्या सहकार्याने अंधारवाडी मधाचे गाव करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प आता पुर्णत्वास आला आहे.

अंधारवाडी गावाची लोकसंख्या 196 असून गावात एकून 65 कुटुंब आहे. आदिवासी उपयोजनेंतर्गत नाविन्यपुर्ण योजनेद्वारे मधाचे गाव ही योजना या ठिकाणी राबविण्यात आली. सुरुवातीस येथील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा विनामुल्य करण्यात आला. आता 25 कुटुंब प्रत्यक्षपणे मध संकलनाचे काम करत आहे. येत्या काही दिवसात अजून 35 कुटुंबांना प्रशिक्षण व साहित्य दिले जाणार आहे.

मध संकलनातून रोजगार व आर्थिक समृध्दी साधण्यासोबतच टिपेश्वर अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाचे मध उपलब्ध व्हावे, हा देखील या संकल्पनेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे पर्यटकांच्या मुक्कामाची व्यवस्था देखील गावकऱ्यांच्या मदतीने येथे केली जात आहे. निसर्गसंपन्न वातावरणात येथे येणाऱ्या पर्यटकांना मध संकलनाची प्रक्रिया गावकरी पर्यटकांच्या हातात मधाचे पोळ देत समजावून सांगत असल्याने वेगळा अनुभव पर्यटकांना येथे घेता येतो. काही विदेशी पर्यटकांनी नुकतीच मधाच्या गावाला भेट दिली.

उत्तम दर्जाच्या मधाला प्रतिकिलो 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. सुरुवातीस गावकऱ्यांना मध संकलनासाठी प्रत्येकी 10 पेट्या देण्यात आल्या आहे. त्यात 5 पेट्या पोळ असलेल्या तर 5 पेट्या रिकाम्या आहेत. एका पेटीत साधारणपणे 6 ते 8 पोळ तयार होतात. मध तयार झाल्यानंतर पोळाला ईजा न होता यंत्राच्या सहाय्याने ते काढले जाणार आहे. पुढे तेच पोळ पुन्हा मधाने भरले जाईल. त्यामुळे कमी कालावधीत अधीक मधाचे संकलन या गावात होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची मधाच्या गावाला भेट

अंधारवाडी गावाने दाखविलेल्या उत्साहामुळे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव होण्याचा मान या गावाला मिळाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. चांगल्या उपक्रमासाठी गावाच्या सरपंच लक्ष्मी मेश्राम, उपसरपंच रविंद्र परचाके व गावकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि निर्णय घेतले जातील 

Tue Dec 10 , 2024
– उद्यान‌ विद्या महाविद्यालय व शेतकरी हितासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आमदार चरणसिंग यांचे प्रतिपाद काटोल :- काटोल विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रातील पंतप्रधान मोदी यांचे सरकार व महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुती चे सरकार शेतकऱ्यांचे हितासाठी वचनबध्‍द आहे,. काटोल विधानसभा मतदारसंघातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com