प्राचीन वारसास्थळांच्या संवर्धनासाठी व्यापक जनजागृती करा -जिल्हाधिकारी आर. विमला

 नागपूर :  19 ते 21 नोव्हेंबर हा आठवडा संपूर्ण जगभरात युनेस्को ‘ जागतिक वारसा सप्ताह ’ म्हणून साजरा करण्यात येतो. नागरिकांना विशेषत: तरुणांमध्ये देशातील प्राचीन वारसांबद्दल जनजागृती करणे तसेच या सर्व वारसास्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची प्रतिज्ञा देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील प्राचीन वारसास्थळांबद्दल व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रम राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

            आझादी का अमृत महोत्सव व जागतिक वारसा दिनानिमित्त मोमीनपुरा येथील हातमाग केंद्र व मध्यवर्ती संग्रहालयाला जिल्हाधिकारी यांनी आज सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपसंचालक प्रशांत सवाई, मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षक जया वाहाने, सहायक अभिरक्षक विनायक निपटूरकर, चित्रकार सुचेंद्र मंडपे यांच्यासह पर्यटक यावेळी उपस्थित होते.

            प्रत्येक देशाला जशी स्वत:ची संस्कृती, परंपरा असते तशीच ती संपूर्ण विश्वाला असते. ‘हे विश्र्वची माझे घर’ असा संदेश भारतीय संस्कृती देते. आपला प्राचीन वारसा सांभाळणे, त्याची काळजी घेणे तसेच त्याचा अभ्यास करुन त्याविषयी अधिक माहिती घेणे सप्ताहनिमित्त महत्वपूर्ण ठरते. शालेय अभ्यासक्रमात जागतिक वारसास्थळांची नावे वाचलेली असतात. पण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाला वाटली पाहिजे. शक्य झाले तर त्याठिकाणी प्रत्यक्ष भेटही दिली पाहिजे. अशा ठिकाणांचे रक्षण करण्याची जबाबदारी सुध्दा आपण निभावली पाहिजे. जागतिक वारसा सप्ताहाचे महत्व ओळखून शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणे आणि संग्रहालयांकडून प्राचीन स्मारकांचे महत्व व त्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

            मोमीनपुरा येथील हातमाग केंद्राला श्रीमती आर. विमला यांनी भेट देऊन तेथील हस्तनिर्मित उत्पादनांची माहिती जाणून घेतली. मध्यवर्ती संग्रहालयातील निसर्ग, पक्षी-प्राणी, हस्तशिल्प, शिल्प, प्राचीन शस्त्र, पुरातत्व, आदिवासी, अस्थायी चित्रकला या दालनांची जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पाहणी केली.

दिनेश दमाहे

9370868686

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Mon Nov 22 , 2021
मुंबई –  संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान दिलेल्या हुतात्म्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीने, प्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com