अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा बसस्थानक परिसरात अज्ञात टिप्पर ने मोटारसायकला क्रमांक MH 36 P6585 ला धडक दिल्याने वडील मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर एका मुलाचे अपघातात जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सायंकाळी 7:30 च्या दरम्यान घडली आहे.
मृतक मुलाचे नाव पियुष सुरेश कांबळी वय 12वषे राहणार घाटकुरोडा यांचा जागीच मृत्यू झाला तर वडिल सुरेश कांबळी वय 40वषे याला डोक्याला व हाताला लागले असुन गंभीर जखमी आहे.तर दुसरा मुलगा धुरुप कांबळी वय 15 वर्ष यांच्या हात व पायाला लागले असुन गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात टिप्पर पळ काढला आहे. वडील व दोन मुले हे मोटारसायकल ने गावी परत येत असताना हा अपघात झाला आहे.या दोन्हीं गंभीर जखमी वडील व मुलाला रुग्णवाहीकेने तुमसर येथील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.तर मृतक मुलांचे शव तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.परिसरात अवैध मुरुम जोरात सुरू असून हा देखील टिपर मुरूमाचा असल्याचे सांगण्यात येत आहे.बातमी लिहीपर्यंत घटनेची नोंद तिरोडा पोलिस स्टेशन झाली नव्हती.