संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन मध्ये चोरीच्या गुन्ह्यात दाखल असलेल्या एका आरोपीने पोलिसाकडून स्वतःला कोणतीही विचारपूस करण्यात येऊ नये यावर संतापून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पोलीस तपास कक्षात असलेल्या आरश्याला स्वतःचे डोके आपटून डोके फोडले व फोडलेल्या आरशाच्या काचेच्या तूकडेने स्वतःच्या हाताने स्वतःच्या गालावर व होटावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी 3 दरम्यान घडली असुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव तरुण अशोक मेश्राम वय 20 वर्षे रा जे पी नगर कामठी असे आहे.यासंदर्भात असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सदर आरोपी तरुण मेश्राम विरुध्द भादवी कलम 309 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.