नागपूर :- विदर्भातील औद्योगिक वीज ग्राहकांसोबत चर्चा करून त्यांच्या तक्रारी व सुचना समजून घेत त्यावर आवश्य्क तो तोडगा काढण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्वत: पुढाकार घेत विदर्भातील अनेक उद्योजकांशी आज (बुधवार दि. 9) त्यांनी आपल्या भेटीदरम्यान चर्चा केली.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफ़ॅक्चरींग असोसिएशन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन याचसोबत गोंदीया, चंद्रपूर, नांदगावपेठ, यवतमाळ या भागातील उद्योगांसोबत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज विविध विषयांवर महावितरणच्या विद्युत भवन येथे चर्चा केली यावेळी, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, प्रादेशिक कार्यकारी संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता (सामुग्री व्यवस्थापन) मनिष वाठ, मुख्य महाव्यवस्थापक (माहीती तंत्रज्ञान) अविनाश हावरे, विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश कोहाट, मुख्य अभियंता (देयके व वसुली) संजय पाटील, अधीक्षक अभियंता धाबर्डे, मुख्य अभियंता (चंद्रपूर) सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता (गोंदीया) पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता (नागपूर) दिलीप दोडके, मुख्य अभियंता (अमरावती) ज्ञानेश कुलकर्णी, मुख्य अभियंता (अकोला) दत्तात्रय पडळकर व अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत उद्योजकांनी ओपन एक्सेस सबसिडी, बॅंक गॅरंटी, नवीन वीज जोड मंजूरी, वीजदर, सुरक्षा ठेव, विशवसनिय वीजपुरवठा, देखभाल व दुरुस्ती, यंत्रणा सक्षमीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करून अनेक विषयांवर्तोडगा देखील काढण्यात आला, यावेळी लोकेश चंद्र यांनी उपस्थित सर्व उद्योजकांच्या माध्यमातून आवाहन केले की, सर्व औद्योगिक वीज ग्राहकांनी आपल्या वीज देयकांचा नियमित भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.
महावितरणने घेतलेल्या पुढाकाराचे उपस्थित अनेक उद्योजकांनी याप्रसंगी कौतूक करून यावेळी उपस्थित उद्योजकांनी महावितरण कर्मचा-यांतर्फ़े दिल्या जाणा-या चांगल्या सेवेची पावती देखील दिली.