तंत्रज्ञानात तज्ज्ञाची 11 लाखांनी फसवणूक

– सायबर गुन्हेगाराने दिले भरघोस लाभाचे आमिष

– पाच दिवसात पती पत्नीचे बँक खाते रिकामे

नागपूर :-सायबर गुन्हेगाराने भरघोस लाभाचे आमिष देवून तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीची 10 लाख 73 हजार रुपयांनी फसवणूक केली. त्यांनी स्वतचे आणि पत्नीच्या बँक खात्यातील संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगाराच्या घशात घातली. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओमकारनगर, अजनी येथील रहिवासी फिर्यादी राजेंद्र वाकोडेकर (38) हे संगणक प्रोग्राम तयार करण्याचे काम करतात. त्यांना तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती आहे. 22 नोव्हेंबर 2023 ला ते घरी असताना त्यांच्या मोबाईल आरोपीने व्हॉट्स अ‍ॅप मॅसेज केला. क्रिप्टो करनसीला जगभरात प्रचंड मागणी आहे. सध्या क्रिप्टोचा रेट वर सरकत आहे. ऑन लाईन खरेदी विक्रीत अनेक लोक जुळले आहेत. क्रिप्टो सारखी करनसी आमच्याकडे असून ती खरेदी केल्यास भरघोष नफा मिळेल असे आमिष दाखविले. त्याच्या आमिषाला बळी पडत राजेंद्रने गुंतवणूक केली. लाभ मिळाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. त्यांनी पुन्हा गुंतवणुकीची रक्कम वाढविली, पुन्हा लाभ मिळाला. त्यामुळे फिर्यादीचा पक्का विश्वास बसला.

राजेंद्र जाळ्यात अडकल्याचे पाहून आरोपीने त्यांना मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी स्वतच्या बँक खात्यातील रक्कम गुंतविली. त्यांना लाभ केवळ ऑन लाईन दिसत होता. शिवाय त्यांना इंस्टा ग्रुपवरही जाडून घेतले. ग्रुपवरील सदस्य लाखांत लाभ झाल्याचे स्क्रीन शॉट टाकत होते. त्यामुळे राजेंद्रनेही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. लाभ दिसत होता, परंतू लाभाची रक्कम काढण्यासाठी पुन्हा गुंतवणूक करण्यास बाध्य केले जायचे. अशा पध्दतीने राजेंद्रने पाच दिवसात स्वतचे आणि पत्नीच्या बँक खात्यातील 10 लाख 73 हजार रुपयांची गुंतवणूक केली. आता त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी काहीच उरले नव्हते. त्यांनी लाभ मागितला असता तो सुध्दा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'एक जिला, एक उत्पाद': नहीं बन पाई बात 

Sat Dec 2 , 2023
– केवल बैठकों का दौर जारी, रिपोर्ट आधी, अन्य कई जिलों की आ गई रिपोर्ट नागपुर :- केंद्र सरकार (Central Government) के साथ-साथ राज्य सरकार (Maharashtra Government) ने ‘एक जिला, एक उत्पाद’ (One district, one product) की संकल्पना पेश की है। इसका मकसद हर जिले के उत्पाद को मंच प्रदान करना और उसे इंटरनेशनल मार्केट उपलब्ध कराना है। केंद्र और […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!