शासनाला बनावट औषधीचा पुरवठा करणा-या टोळीतील एका आरोपीस उत्तर प्रदेश सहारनपुर येथुन अटक

नागपूर :- खोटे सी ओ ए. व जि.एम.पी. प्रमाणपत्र सादर करून त्याद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक नागपुर यांचेकडुन ई टेन्डरींग मिळवुन Recip-500 tablets या बनावट औषधीचा पुरवठा केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे गुन्हा नोंद असून तपासात आहे.

सदर गुन्हयातील आरोपी विजय विजय शैलेन्द्र चौधरी रा फ्लॅट नं १९०७, बिल्डींग नं ०८ पुनम क्लस्टर २. शांतीनगर, मिरा रोड, याचा मा जिल्हा व सत्र न्यायालय नागपुर तसेच मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपुर येथुन जामीन नामंजूर झाल्याने त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आले. गुन्हयाच्या तपासादरम्यान बनावट औषधीचा खरेदीबाबत सहारनपुर उत्तरप्रदेश येथे राहणारे रॉबीन उर्फ हीमांशु तनेजा व त्याचा भाउ रमन तनेजा यांचेशी संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींना पकडण्याकरीता पथक सहारनपुर उत्तरप्रदेश येथे पाठविण्यात आला असता पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी रमन विजयकुमार तनेजा रा लक्ष्मणपुरम जनता रोड सहारनपुर उत्तरप्रदेश हा त्याचे घरून पळुन जात असता मोठ्या शिताफीने त्यास पकडुन कळमेश्वर येथे आणले. आरोपी रॉबीन उर्फ हीमांशु तनेजा हा फरार असुन गुन्हयाचे प्रथमदर्शनी तपासात आरोपीमध्ये वनावट औषधीचे खरेदी विकीचे करोडो रूपयांचा व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असुन बनावट औषधीचे उत्पादन उत्तराखंड राज्यातील देहरादुन परीसरात झाले असल्याची माहीती मिळाली असुन त्याबाबत तपास सुरू आहे. तसेब गुन्हयामध्ये याव्यतिरीक्त त्याचा परीसरातील आणखी आरोपींचा गुन्हयात सहभाग असण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली अनिल म्हस्के (भापोसे) सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग, सपोनि आशिषसिंह ठाकुर, पोउपनि दत्तात्रय कोलटे, पोना सतिश राठोड सायबर सेल, पोशि मनिश सोनोन, पोशि नितेश पुसार यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहनाचे नंबर प्लेट बदलवून अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीला अटक

Mon Jul 1 , 2024
– पोलीस स्टेशन भिवापूरची कार्यवाही भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे ह‌द्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा जावराबोडी येथे पोलिस स्टाफ यांनी नाकाबंदी करून टिप्पर क्र. एम एच ४०/ बीएल ६१०१ वा चालक आरोपी नामे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com