पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉकी (महिला) स्पर्धेकरीता अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती :- जनार्दन रॉय नगर राजस्थान विद्यापीठ, उदयपूर येथे दिनांक 20 ते 24 डिसेंबर, 2022 दरम्यान होणा-या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉकी (महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबीर डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दिनांक 8 ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहे.

खेळाडूंमध्ये अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळची योगेरी बागडे, जयश्री कुडे, मानसी धुमाळ, पलक सवाईमुल, स्वेता धुमाळ व  अंकिता अतकरे, बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळची शिल्पा राठोड, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची पायल चंदेल व  सिमरन बुंदेले, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची मुस्कान गोयल, राखी कुमारी, दिपाली व  शिवानी सूर्यवंशी, गोपीकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेडची स्वामिनी कुलकर्णी, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय,अमरावतीची मोनिका काकडे व प्रगती मोहोड, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची  गायत्री अंभोरे, निशा हिवराळे व तनिषा रामटेके, मांगिलाल शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची प्रिया शुक्ला, राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय, चांदुररेल्वेची  ऋतुजा चावरे व आचल ठाकरे, सिताबाई कला महाविद्यालय, अकोलाची शिवानी पांडे हिचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीय संविधान लोकशाहीचे संरक्षक कवच आहे - नितीन पवित्रकार

Mon Nov 28 , 2022
विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात संविधान दिन साजरा अमरावती :- भारतीय संविधान हे लोकशाहीचे संरक्षक कवच आहे, असे प्रतिपादन युवा संवाद प्रतिष्ठान, अमरावतीचे संस्थापक अध्यक्ष नितीन पवित्रकार यांनी केले. ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, तर प्रमुख अतिथी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!