– 25 वर्षा पुर्वीच्या कॉलेजच्या आठवणीला मिळाला उजाळा
नागपूर :- नागपूरच्या काटोल रोड स्थित रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या 1999 च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन ‘कॉनक्लेव्ह -2024’ चे आज आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 1999 च्या तुकडीच्या रजत समारंभाप्रसंगी या तुकडीच्या माजी विद्यार्थीनी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाच्या संयुक्त सचिव वृंदा देसाई यांनी या माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून माध्यमातून आम्ही येथील विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. ज्या तुकडीला 25 वर्षे पूर्ण होतात त्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन हे रामदेव बाबा विद्यापीठातर्फे दरवर्षी आयोजित केले जाते .यावर्षी 1999 च्या तुकडी मधील विद्यार्थी एकत्र जमले असून ते सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून प्लेसमेंट मध्ये तसेच त्यांच्या जीवनातील इतर बाबींमध्ये काय मदत व मार्गदर्शन होईल याकडे लक्ष देत असल्याचे वृंदा देसाई यांनी स्पष्ट केले. पूर्वाश्रमीच रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आता एक विद्यापीठ झाल आहे आणि येथे उपलब्ध झालेल्या सोयी सुविधा पाहून आम्हाला अभिमानास्पद वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रामदेव बाबा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . राजेश पांडे यांनी सुद्धा या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली आणि विद्यापीठातील सुविधांची माहिती दिली .रामदेव बाबा युनिवर्सिटी कनेक्ट असोसिएशन तर्फे हे आयोजन दरवर्षी जी बॅच 25 वर्ष अर्थात रजत महोत्सव साजरा करते त्यांना आमंत्रित करत केले जाते. या अनुभवी विद्यार्थ्यांसोबत येथील शिक्षकवृंदाशी संवाद होतो यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळते असे डॉ. पांडे यांनी सांगितले.
रामदेव बाबा अभियांत्रिकी कॉलेजमधून 1999 च्या तुकडीचे विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत या विद्यार्थ्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विस चे डाटा सायन्सचे संचालक अखिल हांडा,केटन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक मनीष बंसल, जर्मनी येथील थॉट वर्क या कंपनीच्या प्रॉडक्ट मॅनेजर रिजू कन्सल, एपीएसी विजा कंपनीच्या अनिता बंसल, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे चीफ डाटा ऑफिसर सुशील ओसवाल ,एएमजी आर्किटेकचे संचालक अभिजीत गौलकर, डीएक्ससी कंपनीचे सीनियर डिलिव्हरी मॅनेजर सचिन कठोरिया, अमेरिकेमधील याहू कंपनीच्या सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर राजश्री चोपडे, एएनएसआर बंगळुरूच्या कंपनीचे संचालक प्रतीक पाटणकर, बार्क्लेज पुण्याच्या शामली पांडे, जेएसडब्ल्यू आणि एमजी मोटर्स इंडियाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सुधीर कटारिया त्याचप्रमाणे नागपूर येथील परफिशियंटच्या टेक लीड मंजुषा डहाणे या प्रतिशिष्ठीत व्यक्तींचा समावेश आहे.