सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे महापौरांचे आवाहन

चंद्रपूर  : लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी, तसेच 60 वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना मात्रा घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास  10 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस देण्यात येत आहे.  सर्व ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे. सर्व नागरिकांचे शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होईल.

सध्या कोव्हिड नियमावलीमुळे शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व १५ ते १७ वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांनी शहरातील कोव्हॅक्सीन लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करावे, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापनाने पूढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांकरीता आपल्या शाळेत लसीकरण व्हावे यासाठी त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा व १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण करावे, असे आवाहन महापौरांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनात दहा तक्रारींचा आढावा

Tue Jan 11 , 2022
नागपूर : विभागीय लोकशाही दिनात आज जुन्या दहा तक्रारींवर चर्चा करुन केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागीय लोकशाही दिनात आज अर्जदाराकडून एकही तक्रार प्राप्त झाली नाही. उपायुक्त आशा पठाण यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. जुन्या 10 तक्रारींमध्ये नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाची 5 प्रकरणे, महानगरपालिकाचे 1 प्रकरण, सावनेर उपविभागीय कार्यालय 1, चंद्रपूर जिल्हा परिषद 1 , चंद्रपूर महानगरपालिका 1, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय एक प्रकरणांचा समावेश आहे.             या लोकशाही दिनाला विशेष पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com