सर्व मूर्तीकार कलावंतानी नोंदणी/परवाना घेणे आवश्यक

-पी.ओ.पी. मूर्तीची स्थापना करु नये

-मनपाचे जनहितार्थ आवाहन

नागपूर :- शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा याकरिता सर्व मूर्तीकार कलावंतानी नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत नोंदणी/परवाना घेणे आवश्यक आहे. अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.

घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, मा. उच्च् न्यायालय नागपूर खंडपीठ येथे दाखल याचिका क्र. 3/2021 दि. 07/08/2023 च्या आदेशान्वये केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दि. 12 में 2020 वऑगस्ट 2022 चे मार्गदर्शक सुचनाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. यंदायेत्या 19 सप्टेंबर रोजी श्री गणेशाचे आगमन सर्वत्र होत असून, गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी गणेशोत्सव पर्यावरणपूरक होणाच्या दृष्टिने शहरातील सर्व नागरिक, भावीक, मूर्तीकार तसेच कलावंताना काही निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.

यात सर्वप्रथम सर्व मूर्तीकार कलावंतानी पर्यावरण पूरक मूर्तीची निर्मिती करण्याकरीता मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोंदणी/परवाना घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी शहरातील जलाशयाचे प्रदुषण रोखण्यासाठी पी.ओ.पी. मुर्तीची स्थापना करू नये, पर्यावरण पूरक साहित्याने निर्माण केलेल्या मातीच्या मूर्तीची स्थापना करावी, मूर्तीकारांनी घातक व अविघटनशील रासायनीक रंगाचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आले असून, पर्यावरण पूरक रंगाचा वापर करावा.

सार्वजनिक गणेशोत्सव् मंडळाच्या गणेश मूर्तीसाठी कमाल उंचीचे कोणतेही निर्बंध 2023 च्या गणेशोत्सवाकरीता असणार नाही. तरीगणेश विसर्जन फक्त् कृत्रिम तलावामध्येच करावयाचे असल्याने ज्या सार्वजनिक मंडळाचे गणेश मूर्ती 4 फुटापेक्षा अधिक असतील त्यांनी विसर्जनाची व्यवस्था महानगरपालिका हद्दीच्या बाहेर करावे व तसे संबंधीत पोलिस विभागाला कळवुन रितसर मिरवणुकीची परवानगी घ्यावी. घरघुती गणेश मुर्तीसाठी या अगोदर 2 फुट उंचीची कमाल मर्यादा करण्यात आली होती तरी यावर्षी घरघुती गणेश मुर्तीसाठी उंचीची कोणतीही मर्यादा असणार नाही. परंतु, घरघुती मूर्तीच्या उंचीवर स्वखुशीने 2 फुट उंचीची मर्यादा पाळावी. असे आवाहन ही डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.

मनपा क्षेत्रातील संपूर्ण तलाव प्रतिबंध करण्यात येणार असून, नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे,मूर्तीच्या सजावटी करीता प्लास्टीक व थर्माकोलचा वापर करु नये, अवैध विनापरवाना मूर्तीची निर्मिती, भांडारण, वापर व विक्री करीत असल्यास तसेच मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्यास रु. 10,000/- दंड/शास्ती आकारण्यात येणार आहे. याची दक्षता मूर्तिकारांनी घ्यावी असेही डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपुर जिले का सर्वांगीण विकास चाहिए तो 'हैट्रिक' रोको 

Thu Aug 24 , 2023
– वर्ना छोटे जनप्रतिनिधियों का अस्तित्व समाप्त हो जाएगा  नागपुर :- अगले वर्ष देश में लोकसभा चुनाव होने वाली है,इसकी बिगुल बज चुकी है,अमूमन सभी पक्षों ने तैयारियां भी शुरू कर दी हैं.जहाँ तक नागपुर जिले का सवाल हैं जिले के दोनों सांसद का दूसरा कार्यकाल समाप्ति पर हैं,जनता दोनों से ऊब चुकी है,इसलिए उम्मीदवार बदलो अन्यथा ‘हैट्रिक’ रोको अभियान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!