आयुर्विमा कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास हेच संघटनेचे एकमेव ध्येय : चक्रवर्ती

नागपुर :- भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रमुख संघटना नागपुर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनने आपल्या स्थापनेपासुनच कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशाने संघर्षाच्या माध्यमातून वेळोवेळी दूरद्रूष्टीने निर्णायक भूमिका घेत आयुर्विमा कर्मचाऱ्यांचे हित जपले आहे. विमा कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास हेच संघटनेचे एकमेव ध्येय आहे, असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भारतीय विमा पेंशनर्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष टि.के.चक्रवर्ती यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणातून आज येथे केले.

विश्वास व एकतेचे प्रतिक असलेल्या नागपुर विभागीय आयु्र्विमा कर्मचारी युनियन नागपुर डिवीजनमधील सर्व शाखा व विभागातील कर्मचाऱ्यांचे संयुक्त वार्षिक संमेलन आज डिटीसी हॅालमध्ये यशस्वीपणे थाटात संपन्न झाले.

या वार्षिक संमेलनाचे उद्घाटन टि.के.चक्रवर्ती यांनी केले.मुख्य अतिथी म्हणून पश्चिम क्षेत्रीय विमा कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष कॅा.अनिल ढोकपांडे तर संमेलनाध्यक्षपदी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कॅा.शिवा निमजे, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कामगार नेते रमेश पाटणे, संघटनेचे विभागीय सरचिटणीस वाय.आर.राव इ.नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.

टि.के.चक्रवर्ती यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व एलआयसीतील परिस्थिती,वेतनवाढ,पेंशन, केंद्र सरकारची आर्थिक-औद्योगिक धोरणे व संघटनेपुढील आव्हाने इ.बाबत सविस्तर माहिती दिली. भारत सरकारच्या कामगारविरोधी व जनविरोधी धोरणांच्या विरोधात विमा कर्मचा-यांनी एकजुटीने सर्वसमावेशक असा लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना यावेळी केले. याप्रसंगी सर्व नेत्यांनी आपआपल्या भाषणांतून संघटना बळकट करण्याचे आवाहन केले. स्वागत समारंभानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणातून सहसचिव अभय पांडे यांनी संघटनकार्याची माहिती विशद केली. या संमेलनाचे सुत्रसंचालन डॅा. स्मिता माहूरकर यांनी तर उपस्थितांचे आभार माधुरी गुरनुले यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ओडिशातील रेल्वे दुर्घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

Sat Jun 3 , 2023
– पंतप्रधान स्थितीची समीक्षा करण्यासाठी ओडिशाच्या दौऱ्यावर मुंबई :- ओडिशा राज्यात झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी स्वतः ओडिशाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या ट्विट संदेशात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ओडिशातील भयानक रेल्वे दुर्घटनेनंतर झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com