अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नागपूरच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यावतीने 8 ते 10 एप्रिल दरम्यान तीन दिवसीय ‘ वॅमकॉन -2022’  वार्षिक परिषदेचे आयोजन

नागपूर  – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या  मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था -एम्सच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने येत्या 8 ते 10 एप्रिल दरम्यान विदर्भ असोसिएशन  ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्ट च्या वतीने   तीस-या वार्षिक परिषद ‘वॅमकॉन-2022 ‘  चे आयोजन करण्यात आले आहे . या वर्षीच्या परिषदेची संकल्पना ‘ मॅन व्हर्सेस मायक्रोब्स : द सी-सॉ राईड ‘ ही असून  करोना महामारीच्या काळात कोवीड  विषाणूने मानवजातीवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महत्त्वाची आहे . या तीन दिवसीय परिषदेत सुमारे 200 मेडिकल  मायक्रोबायोलॉजिस्ट   विदर्भक्षेत्रातून तसेच लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातून सुद्धा सहभाग घेणार असून   या परिषदेत विविध प्रकारच्या   कार्यशाळा, परिसंवाद, वाद विवाद स्पर्धा  प्रश्नमंजुषा  स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत . या परिषदेत प्रामुख्याने अ‍ॅन्टीमायक्रोबियल रेजिस्टन्स टेक्निक्स , लाइफस्टाइल इंटर्वेंशन फोर हेल्थ केअर वर्कर्स या प्रमुख विषयांवर चर्चा/परीसंवाद  होणार आहे .

कोवीड नंतरच्या काळामध्ये मायक्रोबायोलॉजीस्टचे महत्व अधोरेखित झाले असल्याने  मुक्यरमायकोसीस सारखे आजार आपल्याला बरे करता आले असे या परिषदेच्या आयोजन सचिव डॉ. मीना मिश्रा यांनी सांगितलं. एम्सच्या संचालिका  डॉ.  विभा दत्ता   यांनी यावेळी एम्स नागपूर संदर्भात विवेचन केल. पदवी अभ्यासक्रमाच्या 125 जागा तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या  50  जागा  असून  एम्स नागपुरमध्ये  27 विभाग आहेत ,   यूरोलॉजी नेफरोलॉजी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी यासारखे नवीन विभाग सुद्धा येत्या जुलैपर्यंत मध्ये येथे येतील अशी माहिती त्यांनी दिली.एम्स नागपूर शहराच्या  बाह्य भागात असल्याने येथे येण्यासाठी खापरी मेट्रो स्टेशन  ते एम्स पर्यंतच्या बस सुविधा सुद्धा वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे असेही डॉ.दत्ता यांनी सांगितलं.  एम्सच्या सुविधा शहरी भागात नंदनवन येथे तसेच नागपूर जिल्ह्यात बेला येथे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा एम्सने दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगितलं.

तीन दिवसीय  परिषदेमध्ये चे सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील डॉक्टर्स शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी प्रामुख्याने आणि   मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन सचिव डॉक्टर मीना मिश्रा,    विदर्भ असोसिएशन  ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीस्टचे अध्यक्ष   डॉ. दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वेकोलि ने जिला सैनिक कल्याण को 4.99 लाख की राशि भेंट की

Thu Apr 7 , 2022
नागपुर – वेस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड के निदेशक (कार्मिक) डॉ. संजय कुमार ने आज नागपुर की जिलाधिकारी एवं अध्यक्ष, जिला सैनिक कल्याण कार्यालय, नागपुर, आर. विमला, (IAS) से मुलाक़ात की और भारतीय सेना के शहीद जवानों, उनके परिवार जनों, आश्रितों के कौशल विकास एवं सैनिकों के पुनर्वास एवं आजीविका हेतु टीम वेकोलि के सदस्यों द्वारा स्वेच्छा से एकत्रित की गई राशि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!