– मुख्य संरक्षक म्हणून गिरीश व्यास, उपाध्यक्षपदी प्रभजीत सिंह बछेर यांची निवड
नागपूर :- ऑल इंडिया कॅरम फेडरेशनच्या नवीन कार्यकारिणी घोषणा नुकतीच करण्यात आली. फेडरेशनच्या अध्यक्षपदी रकीबुल हुसैन विरोधी पक्ष नेता आसाम तर उपाध्यक्षपदी विदर्भाचे( महाराष्ट्र) प्रभजीत सिंह बछेर यांची निवड करण्यात आली. नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची अविरोध निवड करण्यात आली.
दिल्ली येथे झालेल्या निवडणुकीत उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एस. एस चौहान यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम सांभाळते. यावेळी आंतरराष्ट्रीय कैरम फेडरेशनचे अध्यक्ष जोसेफ मेयर हे स्वित्झर्लंड हून दूरदृष्य प्रणालीद्वारे जुळले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधीत केले. यावेळी कार्यकारिणीची घोषणा झाल्यावर झालेल्या कार्यकारिणी बैठकीत फेडरेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी चर्चा करण्यात झाली. याप्रसंगी कार्यकारणीच्या वतीने एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात झाला. यात माजी आमदार गिरीश व्यास महाराष्ट्र यांना सर्वानुमते मुख्य संरक्षक म्हणून निवड करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणी अध्यक्ष- रकीबुल हुसैन, वरिष्ठ उपाध्यक्ष – नीरज कुमार संपथी. उपाध्यक्ष- प्रभजीत सिंह बछेर, गुरींदर सिंग, विजय कुमार. महासचिव – भारती नारायण, सहसचिव पूर्व-डिबेयेंदू सिंलाई, उत्तर पूर्व- फ्रर्डीनाड नॉन्ग्रीक्रिह उत्तर-आदिल राशीद शहा, दक्षिण- मो. असदुल्ला खान अंसारी, पश्चिम – व्रजेश जिंदल. कोषाध्यक्ष- एस. मदन राज.
कार्यकारी समिती सदस्य – दिल्ली कॅरम असोसिएशन, राजस्थान कॅरम असोसिशन, स्टेट कॅरम असोसिएशन झारखंड, स्टेट कॅरम असोसिएशन केरळ, युपी कॅरम असोसिएशन, उत्तरांचल कॅरम असोसिएशन.
सभेचे संचलन रकिबुल हुसैन यांनी तर आभार प्रदर्शन प्रभजीत सिंह बछेर यानी केले.