नागपूर :- फिर्यादीचे मित्र नामे सुशील संजय काळमेघ, वय २७ वर्षे, रा. सुरेंद्रगड, गिट्टीखदान, नागपुर व भुपेंद्र रमेश दुधबर्वे वय ३३ वर्ष रा. नरसाळा, प्रिंसेस लॉन जवळ, नागपुर हे दोघे भुपेंद्रचे पल्सर मोटरसायकल क. एम.एच. ४९ सि. के ७३६१ ने पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीतील व्हि.आय.टी. इंजीनियरींग कॉलेज, उमरेड रोड येथुन घरी जात असता कान्हा सेलेब्रेशन लॉन समोर, उमरेड रोड येथे, होन्डा शाईन गाडी क्र. एम.एच ३६ ए.एम, ६८७७ ने चालकाने त्याने ताब्यातील मोटरसायकल भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचे मित्राचे गाडीला धडक देवुन गाडीवरील दोघांनाही गंभीर जखमी केले. व स्वताःही जखमी झाला. जख्मी फिर्यादीचे मित्र सुशील यास उपचाराकरीता लता मंगेशकर हॉस्पीटल येथे व भुपेंद्र याला मेडीकल हॉसपीटल येथे दाखल केले होते. उपचारादम्यान दि. १२.१२.२०२४ चे ०४.३० वा. डॉक्टरांनी फिर्यादीचा मित्र सुशील काळमेघ यास तपासुन मृत पोषीत केले. जखमी भुपेंद्र याचेवर उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी निखील बाबाराव बानाईत वय २५ वर्ष रा. प्लॉ. नं. ३०, वार्ड नं. ०२, कळमणा गाव, उमरेड रोड, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे पोउपनि, नकाते यांनी आरोपीविरूध्द कलम २८१, १२५ (ब), १०६(१) भाज्या.सं. सहकलम १८४ मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.