संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6:-कामठी नगर परिषद निवडणूक लवकर होण्याच्या मार्गावर असून मंगळवारी दुपारी 12 नंतर नगर परिषदेच्या प्रभाग रचनेचा अंतींम आराखडा प्रसिद्ध होणार आहे.तत्पूर्वी प्रभाग रचनेच्या आराखड्यावर शहरात 47 आक्षेप घेण्यात आले होते .त्यात रमानगर चा आक्षेपाला जास्तच रंगत आल्याने 7 जून मंगळवार ला प्रसिद्ध होणाऱ्या प्रभाग रचनेच्या आराखडयात काही बदल होणार का? याकडे लक्ष वेधले आहे.
बदल झाल्यास आक्षेपकर्त्याना आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना मिळणार आणि बदल न झाल्यास आहे त्याच परिस्थितीत लढायचे किंवा नाही हे उद्या 7 जून ला स्पष्ट होणार आहे.त्यानंतर खऱ्या अर्थाने कामठी नगर परिषद च्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.त्यामुळे माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार यांच्या नजरा उद्या प्रसिद्ध होणाऱ्या अंतीम प्रभाग रचनेकडे लागले आहेत.प्रभाग रचना व आरक्षण सोडत पूर्ण झाल्यानंतर दावेदारी करावी अशी भूमिका अनेक इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे.त्यामुळे काही इच्छुकांनी छुप्या पद्ध्तीने प्रचार सुरू केला आहे.तरीही आरक्षण व प्रभाग रचनेची धाकधूक मनात असल्याचे अनेक इच्छुकांकडून खाजगीत बोलल्या जात आहे.परंतु शहरातील राजकीय पक्ष प्रभागातील उमेदवार कोण असावा याकडे लक्ष ठेवून आहेत .आरक्षण व प्रभाग रचना पाहून योग्य तेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा अशी भूमिका सर्व पक्षानी घेतली असल्याचे बोलले जाते.शहरात एक प्रभाग वाढला असल्याने दोन नगरसेवकात वाढ होणार आहे.एकंदरीत प्रभाग रचना व आरक्षण सोडत झाली की नगर परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
मंगळवारी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम प्रभाग रचनेकडे सर्वांच्या नजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com