नागपूर:- केदारे मॅरेज ब्युरोतर्फे विदर्भ साहित्य संमेलन सभागृह मोर भवन येथे सर्व जाती पुनर्विवाह परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हलबा समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक गिरीधारी निमजे होते, तर विशेष अतिथी म्हणून सुरेश कुंभारे, अंबादास पराते, श्याम सोनकुसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक भास्कर केदारे म्हणाले की, आज हलबा समाजाला फेकल्यासारखे वागवले जात आहे, जिथे आपली माणसे आपल्याच माणसांना घेऊन जात नाहीत. त्यामुळे समाज दुर्बल होत चालला आहे.
आपल्या भाषणात त्यांनी शेतकरी आत्महत्या, भेसळ आदी विषयांवरही प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात गिरधारी निमजे म्हणाले की, पुनर्विवाह ही काळाची गरज आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सोबती हवा असतो. ज्यांच्यासाठी अशा परिचय मेळाव्याचे आयोजन भरवल्या जातात, त्यामुळे पुनर्विवाहावर भर देऊन अशा परिचय मेळावा प्रत्येक समाजात घेतल्या पाहिजेत. त्यांनी आजपर्यंत 142 विवाह जोडले आहेत. यावेळी सुरेश कुंभारे, अंबादास पराते, श्याम सोनकुसरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, छत्तीसगड आदी राज्यातील तरुण-तरुणींनी परिचय संमेलनात सहभाग घेतला.