संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 22:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सुमन विहार रहिवासी व कामठी च्या चौधरी हॉस्पिटल मध्ये कार्यरत एका तरुण डॉक्टराने दारूच्या नशेच्या विरहात आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल दुपारी 2 दरम्यान घडली असून मृतक डॉक्टर चे नाव डॉ कोमल सिंह ठाकूर वय 45 वर्षे राहणार घर क्र 18 ,सुमन विहार, कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक डॉक्टर हे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असून या दारूच्या नशेत घरात पत्नीशी भांडण करणे हे नित्याचेच झाले होते.घरात मागील काही दिवसापासून घरगुती कलह सुरू असल्याने घरात कौटुंबिक तनावाचे वातावरण निर्माण झाले होते यानुसार काल दुपारी मृतक डॉक्टर हे काल दुपारी 2 दरम्यान घरी आले असता पत्नीशी वाद घातला हा वाद विकोपाला गेल्याने पत्नीसमक्ष घरातील एका खोलीचे दार आतून बंद करून सिलिंग फॅन ला दोरीने गळफास लावून आत्महत्या करीत जीवनाचा कायमचा निरोप घेतला.
सदर घटनेची माहिती कपिलनगर पोलिसांना कळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करित मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मृतक डॉक्टर च्या पाठीमागे पत्नी तसेच एक मुलगा असा बराच आप्तपरिवार असल्याचे सांगण्यात येते.
दारूच्या नशेच्या विरहात डॉक्टरची गळफास लावून आत्महत्या
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com