श्रीराम जन्मभूमी अयोध्येत पूजन केलेल्या अक्षीत कलश यात्रेची कामठी शहरात मिरवणूक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची जानेवारीमध्ये प्रतीष्ठापना होणार आहे,त्यानिमित्ताने कामठी शहरात प्रत्यक्ष अयोध्या येथून आलेल्या पूजीत अक्षीत कलशाची यात्रा आज 1 जानेवारीला फटाक्यांची आतिषबाजी व ‘जय श्रीराम ‘नामाच्या जयघोषात काढण्यात आली.

श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र अयोध्या पूजित अक्षित कलशाची मिरवणूक आज 1 जानेवारीला दुपारी 1 वाजता श्री गंज के बालाजी मंदिरातून काढण्यात आली. जय श्री राम नामाचा जयघोष करीत उत्साहपूर्ण वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांची मंगल कलश यात्रेत अनेक महिला पुरुष व तरुणाई मंडळी सहभागी झाले होते.

अनेक महिलांनी डोक्यावर कलश घेऊन भव्य शोभा यात्रेत सहभाग नोंदविला होता.ही मिरवणूक श्री गंज के बालाजी मंदिरातून निघताच जयभीम चौक,यादवनगर,जयस्तंभ चौक, गोयल टॉकीज चौक,गांधी चौक,चावडी चौक,नेताजी चौक,दाल ओली नं 2 मार्गे राम मंदिर येथे पोहीचली.अक्षीत कलश यात्रेचे ठिकठिकानी भाविकांनी दर्शन घेतले.या शोभायात्रेने येथील वातावरण भक्तीमय बनले होते.ही अक्षीत कलश यात्रा राम मंदिरात पोहोचताच येथे महाआरती करून समारोप करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीताविरुद्ध गुन्हा नोंद पोलीस स्टेशन भिवापुर अंतर्गत कारवाई

Mon Jan 1 , 2024
भिवापुर :-दिनांक २९/१२/२०२३ रोजी पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ शासकीय वाहनाने पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना मौजा महसुल चेक पोस्ट नाका भिवापुर गावाजवळ भिवापुर ते उमरेड जाणारे हायवे रोडवर अंदाजे २३/१५ वाजता दरम्यान भिवापुर कडून नागपुरकडे अवैद्यरित्या विनापरवाना रेती (वाळु) टिप्पर मध्ये लोड करुन येतांना एक टिप्पर दिसुन आल्याने शासकीय वाहन नेवून टिप्पर चालकास थांबण्याचा इशारा केला असता टिपर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com