अरोली :- मागील पन्नास वर्षांपूर्वीपासून सुरू असलेला सार्वजनिक हनुमान मंदिर, बाजार चौक ,दहेगाव येथील अखंड श्रीमद हरिनाम भागवत सप्ताह यावर्षी सुद्धा मानवांच्या प्रगती, विकासस्फूर्ती ,मनुष्यांच्या आत्म्याला शुद्ध विचार प्राप्त व्हावा, भागवत नामाच्या गजर जीवनात यावं म्हणून समस्त भक्त व ग्रामवासियांच्या तन-मन-धनाने 28 डिसेंबर 2024 शनिवारपासून ते 4 जानेवारी 2025 शनिवार पर्यंत आयोजित केलेले आहे. या अखंड श्रीमद हरिनाम भागवत सप्ताहाचे लाखनी जिल्हा भंडारा येथील प्रवचनकार ह. भ. प. डॉ. भागवताचार्य रामदास बिसेन महाराज प्रवचन करणार आहेत.
आज शनिवार 28 ला सकाळी 11 वाजता घटस्थापनेने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून दर दिवशी दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणे राहणार आहे.पहाटे पाच ते सहा सामुदायिक ध्यान काकड आरती ,सकाळी सात वाजता रामधुन ,सायंकाळी सात वाजता हरिपाठ ,रात्री आठ ते 11 वाजता भागवत कथा, ह .भ. प. रमेश शहारे महाराज यांच्या भारुड, गजानन वकेकार यांच्या तबला, जगदीश रहेले यांच्या ऑर्गन, वासुदेव वाहने महाराज बाम्पेवाडा हे सर्व सहकारी भागवत कथेला संगीतमय, मनोरंजक करण्यासाठी मदत करणार आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक जानेवारीला गोवर्धन पूजा, 3 जानेवारीला भोवरी येथील कीर्तनकार भागवत घुघुसकर, दहेगाव येथील भूमिका अंगत डुंबरे यांच्या जागृती भजनाच्या कार्यक्रम कार्यक्रम, 4 जानेवारीला सकाळी आठ वाजता भजनाच्या कार्यक्रम, साडेदहा वाजता गोपाल काल्याचे किर्तन, दुपारी एक वाजता नागपूर येथील मूर्ती दाते दीपक सूचक यांच्या हस्ते दहीहंडी पूजन, गोपाल काला व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे वितरण होणार आहे.
तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान बाबू हटवार ,रवी आंबिलढूके ,भगवान अंबिलढूके ,आनंदराव आंबिलढूके, रामचंद्र देशमुख, मोतीकुमार नागपुरे , यादवराव आंबिलढूके ,विष्णू आंबीलढूके, विनोद आंबीलढूके ,भोला देशमुख , इस्तारू आंबील ढूके, राजू चन्ने, चंद्रशेखर आंबील ढूके, ऋषभ हटवार सह समस्त ग्रामवासयांनी केले आहे व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामवासी सहकार्य करून परिश्रम घेत आहे.