संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 21:-कामठी तालुक्यातील आजनी येथे नवयुवक युवा मंडळातर्फे १० मार्च रोजी उद्घाटन झालेल्या अंडर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे रविवार दिनांक २० मार्च २०२२ रोजी जे एन सी सी व नवयुवक युवा मंडळ यांच्यात अंतिम सामना खेळून समापन झाले.
अंतिम सामन्यात जे एन सी सी क्रीडा मंडळ, नागपूरने प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले तर अकरा हजार रुपयांचे द्वितीय क्रमांकाचे रोख पारितोषिक नवयुवक युवा मंडळ, आजनी यांना मिळाले. तिसऱ्या क्रमांकाचे सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक राममंदिर क्रीडा मंडळ, पारडी यांना तर चार हजार रुपयांचा चतुर्थ पुरस्कार के एम सी क्रीडा मंडळ, कामठी यांना मिळाला. याशिवाय अन्य वैयक्तिक पुरस्कार आणि विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते कप ,शिल्ड वितरित करण्यात आले.
या स्पर्धेला उद्घाटक म्हणून कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंदजी सावरकर लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद नागपूर माजी विरोधी पक्ष नेते अनिल भाऊ निदान, पंचायत समिती सभापती उमेश भाऊ रडके, सरपंच सुनील भाऊ मेश्राम, सचिव राहुलजी डोरले,,कैलास भाऊ महल्ले, बळवंतरावजी रडके, किरण भाऊ राऊत, प्रवीण दादा कुथे, दिलीपजी वानखेडे, सचिन भाऊ डांगे, किशोरजी बेले, खुशालजी विघे, दिवाकरजी घोडे, एकनाथजी महल्ले, अमोल लोहकरे, धर्मराज येलेकर, शंकर भोयर, महेंद्र मिरासे, विनोद वाट, विठ्ठलजी विघे, शेषरावजी चौके, कामरान भाई, आकाश देवतळे, सुधाकर विघे, सुरेश भाऊ वाट, हंसराज सोनटक्के यांची विशेष उपस्थिती होती.
संचालन कवी लिलाधर दवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश कोठाडे यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नवयुवक युवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, वीर बजरंग क्रीडा मंडळ, सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिका आणि वाचनालय, जय बजरंग क्रीडा मंडळ, रेणुका क्रीडा मंडळ,ग्राम पंचायत आजनी आणि समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केले.