अजितदादांची मुलाखत पिकली खसखस …

अलीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस होता, अजित दादांच्या वाढदिवसानिमीत्ते त्यांची पत्रकार विजय चोरमारे यांनी घेतलेली मुलाखत आणि पुण्याच्या अंकुश पवार यांनी एका पत्रातून नेमके उलगडून दाखविलेले अजितदादा, ऐकून आणि वाचून नेमके आणि सविस्तर अजित पवार त्यातून कळले. चोरमारे यांना मुलाखत देतांना अजितदादा यांनी, मी निर्व्यसनी आहे, हे वाक्य जेव्हा तोंडातून काढले तेव्हा विजय चोरमारे यांना हसू आवरत नव्हते किंबहुना जे अजितदादांना अगदी जवळून बघतात ओळखतात माझ्यासहित त्यांना देखील दादांच्या या वाक्यवार हसू आवरले नाही, जो ते वाक्य ऐकतो पॉट धर धरून हसत सुटतो. विशेषतः मी निर्व्यसनी आहे हे जेव्हा अजित पवार म्हणाले तेव्हा दस्तुरखुद्द सुनेत्रा वहिनी, खासदार सुनील तटकरे आणि छत्रपती उदयन राजे भोसले या तिघांनी म्हणे एवढ्या जोराने भिंतीवर डोके आपटून घेतले कि पुढले चार दिवस त्या तिघांनाही मोठे टेंगुळ आल्याचे समजले. दोंनपैकी दादांच्या एका वैयक्तिक आवडीविषयी कि आंबट शोकाविषयी मला येथे पुरावे अजिबात मांडायचे नाही कारण हि ती योग्य वेळ नाही, यावेळी भाजपासंगे सत्तेत आलेले अजितदादा यांनी नेमके ठरवावे कि त्यांना किरीट सोमय्या व्हायचे आहे कि देवेंद्र फडणवीस पद्धतीने आणखी पुढे जात घराघरातल्या देवघरात स्वतःचे फोटो लागलेले बघायचे आहे. किरीट समय्या यांना संघातल्या भाजपा मधल्या अनेकांनी कित्येकांनी प्रेमाखातर अगदी सुरवातीपासून सांगून बघितले होते कि पैसे किंवा बायकांची लफडी सांभाळून कर नाहीतर एकदिवस जत्रेत कमावले आणि लुगड्यात गमावले, अशी वेळ तुमच्यावर येईल अर्थात दादांसारख्या आक्रमक, दादागिरी करणार्या नेत्यांना सांगण्याची हिम्मत होत नसते, सोमय्या यांनी अनेकांचा सल्ला धुडकावून लावला आणि भला मोठा काळा डाग लावून घेतला…

मला माहित आहे मी जो गौप्य्स्फोट पुढे करणार आहे त्यातून भाजपाचे वरिष्ठ माझ्यावर नक्की कोपणार आहेत रुसणार आहेत रागावणार आहेत पण अजित पवारांच्या प्रेमापायी मला कळलेले नेमके सत्य येथे मी सांगणार आहे. अजित पवारांसहित त्यांच्या राष्ट्रवादीतील ज्या ज्या मंडळींना मंत्री करण्यात आले आहे त्यांनी निदान यापुढे तरी परदेशातून खूप महिन्यांनी घरी आल्यानंतर ज्या पद्धतीने नवरा आपल्या बायकोवर दिनरात तुटून पडतो आणि तिला गर्भवती करून पुन्हा दोन महिन्यांनी वर्षभरासाठी परदेशात निघून जातो, पद्धतीने निदान यावेळी तरी अजित पवार यांच्यासहित त्यांच्या समस्त मंत्र्यांनी शासकीय तिजोरी लुटण्याच्या आणि राज्याला लुबाडण्याच्या भानगडीत पडू नये किंबहुना जी फार मोठी चूक एकनाथ शिंदे यांच्या समस्त साऱ्याच मंत्र्यांनी शपथ घेताच केली आणि अनेक गुपिते भाजपाकडे सोपविली नेमकी तीच चूक पुन्हा सत्तेत आल्या आल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी करायला सुरवात केलेली आहे. शिंदे आणि अजितदादा या दोन्ही नेत्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांना सांगतो कि यापुढे जे काही मिळवायचे आहे श्रीमंत व्हायचे आहे ते जरा आहिस्ते आहिस्ते, अन्यथा केवळ एकनाथ शिंदे सोडल्यास त्यांच्या सभोवताली जमा होऊन लुटपाट करणाऱ्या मंडळींना आणि या दोघांच्याही समस्त साऱ्याच मंत्र्यांना ओरबाडण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, शिस्तीचा भाजपा सारे काही ध्यानात ठेवत असतो आणि प्रत्येक पुरावा त्यांच्याकडे जमा केल्या जातो. मिस्टर अजित पवार एकवेळ तुम्हाला दारु गांजा सिगारेट पत्त्ते सट्टा जुगार असे काहीही कोणतेही जरी व्यसन जडलेले असते तरी लोकांनी ते सहन केले असते किंवा आजतागायत या राज्यात असे अनेक मान्यवर नेते मराठी माणसांनी सहन केले कारण ती त्यांची व्यक्तिगत स्वरूपाची व्यसने होती पण महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते एवढे आघाडीवर असायचे कि त्यांच्या व्यक्तिगत व्यसनांकडे मतदार दुर्लक्ष करायचे…

पण जनतेचे पैसे लुबाडण्याचे व्यसन राष्ट्राला आणि राज्याला मागे नेते घातक असते राज्य व राष्ट्र त्यातून रसातळाला जाऊन केवळ पैसे खाणार्या त्या नेत्याचे व त्याच्या कुटुंबाचे तेवढे भले होते आणि हे माझ्याएवढे स्पष्ट सांगण्याची हिम्मत इतर कोणीही करीत नाही कारण त्यांचे माझ्याएवढे माझ्यासारखे निर्मल प्रेम त्या अजित पवारांवर अजिबात नाही. एखादा वखवखलेला तरुण जसा मजबूर असहायय तरुणीवर तिच्या शरीरावर तुटून पडतो तिच्या शरीराचे लचके तोडून मोकळे होतो याच पद्धतीने जर शिंदे आणि पवारांचे मंत्री राज्याच्या आणि लोकांच्या तिजोरीवर तुटून पडणार असतिल तर आज ते मजा मारतील पण उद्या त्यांचा देखील विजय दर्डा झालेला तुम्हाला दिसेल हे माझे वाक्य याठिकाणी लिहून ठेवा. रत्नदीप गायकवाड तुमचा मंत्री मजा मारायला कुठे जातो हे जर माझ्या डायरीत नोंद असेल तर भाजपा वरिष्ठांकडे नक्कीच त्यांची मोठी नोंद असेल. भुजबळ असोत कि मुश्रीफ, तटकरे असोत कि तानाजी, किंवा पैशांना वखवखलेले असे अनेक कित्येक, तुम्हा साऱ्यांची पैशांची भूक केव्हाच मिटलेली आहे, उगाच वेडेवाकडे उद्योग करू नका, नोंद केल्या जाते आहे…

अपूर्ण : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत अंजुमन इस्लामच्या १५० व्या वर्षपूर्ती समारोहाचा शुभारंभ

Fri Jul 28 , 2023
– मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणात अंजुमन इस्लामचे योगदान उल्लेखनीय : राज्यपाल रमेश बैस मुंबई :- गेल्या १५० वर्षांपासून शिक्षण, कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या अंजुमन ई इस्लाम संस्थेने देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात तसेच मुस्लिम समाजाच्या सशक्तीकरणामध्ये उल्लेखनीय योगदान उल्लेखनीय दिले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी येथे काढले. सन १८७४ साली स्थापन झालेल्या मुंबईतील अंजुमन- […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com