प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पूर्वतयारीचा अजित पवार यांच्याकडून आढावा

मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येत असून त्यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने करावयाच्या कार्यवाहीच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. जिल्हा प्रशासन, पोलिस, महानगरपालिका, संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सहकार्याने काम करावे. वाहतुकीचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस पुणे विभागीय आयुक्त, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस आयुक्त,पिंपरी-चिंचवड, विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक, श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) पंकज देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळ,अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, दीपा मुधोळ मुंडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पिंपरी चिंचवड बापू बांगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कृषी महाविद्यालय अधिष्ठाता महानंद माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक संजय कदम, ससून सर्वोपचार रुग्णालय अधिष्ठाता, डॉ. व्ही. पी. काळे, शल्य चिकित्सक, डॉ. नागनाथ यम्मपल्ले, विमानतळ संचालक संतोष डोके दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कामास गती देण्यासाठी सुट्टी दिवशी गर्डर बसवण्याच्या कामास 24 तास परवानगी द्यावी - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Tue Sep 24 , 2024
मुंबई :- पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी तसेच इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलीसांनी परवानगी द्यावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com