अग्निवीर सैन्य भरती मेळावा ; पत्रकार परिषद सांगण्यात आलेले मुद्दे.

नागपुर – विदर्भातील एकूण 10 दहा जिल्हयातून उमेदवारांनी Online नोंदणी केली आहे. नोंदणी केलेले अंदाजे 60,000 उमेदवार नागपूर येथे येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ठरवून दिलेल्या नियमांच्या अधिन राहून जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन या भरती मेळाव्याच्या यशस्वितेसाठी कार्यरत आहे. संचालक, सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्या उपस्थितीत,  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी आढावा बैठकी घेण्यात आल्या. संचालक सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांनी मागणी केल्यानुसार  जिल्हाधिकारी यांनी संबंधित कार्यालयांना जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्या अनुषंगाने नागपूर प्रशासनाचे संबंधित सर्व कार्यालये सैन्य भरती मेळावा -2022 साठी सज्ज आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर सैन्य भरती प्रक्रियेसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यात सैन्या तर्फे येणाऱ्या 150 सेवारत कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेचा समावेश आहे.

अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर अशा दहा जिल्हयातून येणाऱ्या उमेदवारांना भरती मैदानावर ने-आण करण्यासाठी ( बस स्थानक व रेल्वे स्थानक ते विभागीस क्रीडा संकुन मानकापूर ) महानगरपालीकेच्या सीटी बसेसची सुविधा self-paid तत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा रात्रीही कार्यरत असेल.

बाहेरील जिल्हयातून येणाऱ्या उमेदवारांना नागपूर पर्यंत पोहोचवण्यासाठी MSRTC (महाराष्ट्र परिवहन) च्या तर्फे pay and use तत्वावर विशेष बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्या संबंधित माहीती उमेदवारांनी त्यांच्या जिल्हयाच्या बस स्थानकावर उपलब्ध करावी. येणाऱ्या उमेदवारांची स्व:ताची वाहने आणली असल्यास त्याच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था कस्तुरचंद पार्कमध्ये करण्यात आली आहे. उमेदवाराला मैदानावर सोडून वाहन चालकांनी रस्त्यावर गर्दी न करता थेट कस्तुरचंद पार्क मधे आपली वाहने पार्क करावी. रस्त्यावर वाहने उभी करू नयेअसे आवाहन आहे.

भरती प्रक्रियेसाठी आधीच Online नोंदणीकृत पद्धतीने प्रवेशपत्र प्राप्त झालेले उमेदवार त्यावर नोंद असेलल्या दिनांकानुसार प्रवेशपत्र घेऊन ठराविक दिवशीच नागपुरात मैदानावर हजर रहाणे अपेक्षीत आहे. जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार येणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया रात्री 10.00 वाजता मैदानावर सुरू होईल. सैन्य भरती कार्यालयाच्या पूर्वनियोजित पद्धतीनुसार भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. या ठिकाणी कडेकोड बंदोबसत्‍ असेल. निवड प्रक्रीया पूर्ण होत असलेल्या ठिकाणी प्रवेशपत्र असणाऱ्या उमेदवाराशिवाय कुणाला प्रवेश राहणार नाही.

येणाऱ्या सर्व उमेदवारांना थांबण्यासाठी विभागीस क्रीडा संकुल, मानकापूर गेट क्रं – 1 च्या आतील बाजुला असलेल्या पार्कीग मैदानावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी याच जागेचा उपयोग करावा. जेणेकरुन सामान्य जनतेस असुविधा होणार नाही. मैदानावर पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट यांची मुबलक सुविधा करण्यात आली आहे. संकुलाच्या आवारात Self-Paid खाण्याचे स्टॅाल्स उपलब्ध असतील त्याचा उमेदवार लाभ घेऊ शकतात. जे उमेदवार उत्तीर्ण होऊन मेडीकल चाचणी करीता थांबतील त्याना जिल्हा प्रशासनातर्फे जेवनाची नि:शुल्क सेवा देण्यात येणार आहे.

उमेदवारांच्या सुरक्षीततेसाठी तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवेसाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद प्रशासनातर्फे वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहीका, Emergency Medicine Kit उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहे.

नागपूर पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विशेष शाखा व वाहतूक नियंत्रण शाखा यांचे कडून व्यवस्था करण्यात येत आहे.

महानगरपालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणीपुरवठा विभाग, वैद्यकीय विभाग तसेच परीवहन विभागातर्फे सैन्य भरती मेळाव्या दरम्यान आवश्यक असलेल्या सगळया सुविधा वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

देशाच्या रक्षणासाठी व आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी नागपूरात येणाऱ्या उमेदवारांचे नागपूर जिल्हा प्रशासनाकडून व सैन्य भरती कार्यालयाकडून स्वागत करण्यात येत आहे.

सैन्य भरती प्रक्रियेदरम्यान क्रीडा विभागाच्या विभागीय क्रीडा संकुलामधील पुर्वनियोजित व काही ठराविक स्पर्धा/ उपक्रम वेळापत्रकानुसार होतील. त्यासाठी संकुलाचे गेट क्रं- 2 नियमित वापरासाठी उपलब्ध असेल तथापि या ठिकाणी एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित राहू शकतात. त्यामुळे सैन्य भरतीच्या राष्ट्रीय कार्यास नागपूर जिल्हयातील सामान्य नागरीकांनी प्रशासनास सहयोग करावा, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाची आहे.

पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी संबोधित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

काय ते खड्डे,काय तो चिखल... सारेच त्रस्त!

Tue Sep 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  एफ सी आय गोदाम मार्ग, प्रशासनाला दुरुस्ती ची एलर्जी कामठी ता प्रतिनिधि 13 सप्टेबर : नवी कामठी भागातील रमानगर रेलवे क्रॉसिंग ते विक्तुबाबा नगर दरम्यान ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे व त्यात साचणाऱ्या पावसाच्या पाण्या मुळे रोडवर चिखल तयार झाला आहे. त्यामुळे नागरिकांवर काय तो रोड, काय ते खड्डे, काय तो चिखल…. सारेच त्रस्त ! असे म्हणण्याची वेळ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com