पीएचडी फेलोशिपसाठी मुंबईत आंदोलन 

मुंबई :- अनुसूचित जातीतील 761 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना 2022 च्या नोंदणी दिनांक पासून बार्टी द्वारे सरसकट फेलोशिप मिळावी यासाठी मागील सहा महिन्यापासून पुणे व मुंबई येथे धरणे, निदर्शने, उपोषण आदि प्रकारचे आंदोलन सुरू आहे. पुण्यात बार्टी कार्यालयापुढे शंभर दिवस आंदोलन चालले. तर मागील पंधरा दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनात आत्तापर्यंत राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने याकडे जातीयवादी भूमिकेतून हेतूता दुर्लक्ष केलेले आहे. सरकारच्या या अडेलतट्टू भूमिकेच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बेमुदत धरने, निदर्शने व आंदोलने सुरू आहेत.

आज नागपूर वरून उत्तम शेवडे, लालदेव नंदेश्वर, संदीप शंभरकर, महानागरत्न, पल्लवी गायकवाड आदि विद्यार्थी विदर्भ एक्सप्रेस ने मुंबईकरिता रवाना होत आहेत अशी माहिती या आंदोलनातील पीएचडी संशोधक विद्यार्थी उत्तम शेवडे यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माओवादियों के टारगेट पर शहरी स्लम के युवा, ब्रेनवॉश कर गुरिल्ला आर्मी में भर्ती करने का प्रयास 

Wed Feb 7 , 2024
नागपुर :- माओवादियों को गड़चिरोली के नक्सल प्रभावित क्षेत्रों में रहने वाले युवाओं का समर्थन मिलना बंद हो गया है. ज्यादातर युवक या तो पुलिस में भर्ती हो रहे हैं या अन्य सरकारी सेवाओं में जा रहे हैं. पुलिस ने प्रभावित क्षेत्रों में अपनी पैठ भी बना ली है. इसीलिए अब माओवादी भयभीत है. नक्सलियों की गुरिल्ला आर्मी में लड़ाकू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com