सावनेर परीसरात सुरु असणाऱ्या वेश्याव्यवसायावर धाड टाकून देहव्यापार करणाऱ्या पिडीत महिलेची सुटका करून आरोपीतांना केली अटक

सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील विश्रांती लॉज नागमंदिर जवळ सावनेर येथे मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास आणुन वेश्याव्यवसाय सुरु असल्याबाबत गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाल्याने दिनांक १९/१०/२०२४ रोजी सकाळी १०. ०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टॉफ सह विश्रांती लॉज येथे जाऊन रेड केली असता विश्रांती लॉज चालक मालक आरोपी नामे-१) रुपेश उर्फ गोलू राधेशाम छिपा रुविया २) आकाश मोतीलाल खोब्रागडे ३) यश व्यवहारे, अनोळखी ३ इसम यांनी संगनमत करून पिडीत महिलेस पैशाचे आमीष दाखवुन वेश्याव्यवसाय करण्यास एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विश्रांती लॉज सावनेर येथे बोलावून विश्रांती लॉज मधील रुम कुंटणखाना म्हणून वापरण्यास हेतुपुरस्सर परवानगी देवुन पिडीत महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत केले. आरोपीतांविरुध्द कलम १४३ (१) (एफ), ३(५) बी.एन.एस, ३(२) (ए), ५(१) (क), ५(१) (ग), ५(१) (घ), ६(१) (ख), ७(१) (बी) स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधा अधिनियम १९५६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी क्र. १) व २) यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही हर्ष पोहार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा), रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा), अनिल मस्के, सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सा. सावनेर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे सावनेर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि मंगला मोकासे, पोउपनि दीपक निंबाळक, पोहवा सुरेंद्र वासनिक, सुभाष रूडे, सुनिल तलमले, पोअं, अंकुश मुळे, मपोशि हेमलता, जोत्सना यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

Mon Oct 21 , 2024
केळवद :- येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलिंग करीत असता गुप्त बातमीदार व्दारे माहीती मिळाली कि, छिंदवाडा रोडकडुन केळवद मार्गे नागपूर येथे पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखुबी वाहतुक होत आहे. अशी माहीती मिळाल्याने स्टाफ यांनी छिंदवाडा रोडकडुन केळवद मार्गे नागपूर येथे नाकाबंदी केली असता एका पांढऱ्या रंगाची कार क्र. एम. एच ०४/ई एच-२८५४ ही येताना दिसल्याने सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com