राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना, ‘या’ विषयावर बोलू नका!

मुंबईः हर हर महादेव चित्रपटाबाबत कुणीही भाष्य करू नये, अशा सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस या विषयाला जातीय रंग देत असून सध्या आपण या विषयावर बोलू नये, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस या विषयावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे यांनी केला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याविरोधात मोठं आंदोलन केलं.

जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे येथील विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा शो सुरू असतानाच राडा झाला.या आंदोलनानंतर चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला. खरी शिवभक्ती काय असते, ते राज ठाकरे यांच्याकडून शिका, असा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाणही करण्यात आल्याचं वृत्त आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस भरतीतला अडथळा दूर, राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पदांची भरती 

Tue Nov 8 , 2022
मुंबई :-  राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ती स्थगित झाली होती. आता ही प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील अनेक वृत्तपत्रांतून यासंबंधीची जाहिरात (Police Recruitment advertisement) प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता सुमारे 18 हजार 331 पदांवरील पोलीस भरती सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारतर्फे देण्यात आली आहे. 9 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!