नागपूर :- लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पूर्व लोकसभेतील घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर पूर्व विधानसभेचे निवडणूक निरीक्षक म्हणून भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जबाबदारी सोपविली आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यामार्फत जबाबदारीचे पत्र प्राप्त होताच ॲड. मेश्राम यांनी घाटकोपर येथे जबाबदारी स्वीकारली.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा क्षेत्रामध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. यादृष्टीने संघटन आणि बूथ नियोजन यादृष्टीने कार्य करण्यासंदर्भात मुंबई उत्तर-पूर्व लोकसभेतील घाटकोपर पश्चिम आणि पूर्व विधानसभेचे निवडणूक निरीक्षक म्हणून ॲड. मेश्राम यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे १८ मे पर्यंत ही जबाबदारी असेल.
या जबाबदारीकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांचे ॲड. मेश्राम यांनी आभार मानले आहे व दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्णत्वास नेण्याबाबत विश्वस्त केले आहे.