यवतमाळ :- राज्यातील गुणवंत खेळाडूंना राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ईच्छूक खेळाडूंनी यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्हास्तरावर नाव नोंदणी दि. 5 जुलैपर्यंत केली जाईल. विभागस्तरावर दि. 8 व 9 जुलैला चाचणी आयोजन करण्यात येणार आहे. राज्यस्तर चाचणी आयोजन दि. 15 व 16 जुलै रोजी होतील. मिशन लक्षवेध अंतर्गत असलेल्या खेळांकरिता मैदानी, आर्चरी, बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, हॉकी, कुस्ती, शुटींग, टेबल टेनिस, बॅडमिंटन या खेळकरिता सरळ प्रवेशांतर्गत राज्यस्तर पदक किंवा राष्ट्रीय सहभाग असलेल्या खेळाडूंची चाचणी आयोजित होतील.
हॅन्डबॅाल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, जुदो, जीमनास्टिक्स या खेळांकरिता सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी राज्यस्तर सहभाग असलेले खेळाडू अशा दोनही प्रक्रियेद्वारे चाचण्या आयोजित केल्या जातील. सरळ प्रवेश चाचणी अहवालात राज्यस्तरावर पात्र होणाऱ्या खेळाडूंची यादी स्वतंत्र तसेच कौशल्य चाचणीत पात्र होणाऱ्या खेळाडूंची यादी स्वतंत्र विभागीय उपसंचालक यांच्या शिफारशीसह क्रीडापीठ मेलवर दि. 11 जुलै पर्यंत पाठविली जाणार आहे. मैदानी, सायकलिंग, शुटींग या खेळाकरिता राज्य निपुणता केंद्र 20 वर्ष वयोगट अंतर्गत चाचणी आयोजित केली जातील. उरलेल्या खेळाकरिता 19 वर्षाआतील मर्यादा असेल.
प्रत्येक खेळाच्या चाचणी मानकानुसार खेळनिहाय खेळाडूंची चाचणी केली जातील. विभागस्तर निवड समिती खेळनिहाय स्थापन केली जाणार आहे. राज्यस्तरावर खेळनिहाय दिलेल्या मानकानुसार खेळाडू पात्र होतील. याकरिता जिल्हास्तरावर खेळाडूंची नाव नोंदणी करताना खेळाडूंनी सादर केलेल्या अधिकृत स्पर्धेतील प्रमाणपत्राची सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी करिता असलेल्या मानकांची योग्य पडताळणी करून नोंदणी केली जाणार आहे.
विभागस्तरावर देखील संबंधित प्रमाणपत्राची पडताळणी करून त्यानंतर चाचणीचे आयोजन केले जातील. राज्यस्तरावर पात्र झालेल्या खेळाडूंना खेळनिहाय संबंधित चाचणीस्थळी स्पर्धेचे मूळ प्रमाणपत्र, आधार कार्ड, चाचणी करिता लागणाऱ्या खेळनिहाय स्पोर्टकीट सोबत दिलेल्या वेळत व तारखेस हजर राहावे लागणार आहे.
एखाद्या खेळात राज्यभरात विभागनिहाय चाचणी करिता खेळाडूंची संख्या कमी आल्यास सदर खेळाची चाचणी विभागस्तरावर आयोजित न करता सरळ राज्यस्तरावर होईल. अधिक माहितीसाठी खेळाडूंनी http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी कळविले आहे.