– विणकर समाजाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल
कन्हान :- प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर श्री आदित्य जैन व निशी जैन आदित्य कँलेक्शन व श्री आदिविद्या हँडलुम प्रोजेक्ट प्रोड्युसर कंपनी कन्हान संचालक हयांना प्रजासत्ताक दिनी विशेष सन्मानाने नवी दिल्ली येथे परेड व मंथन बैठकीत सहभागी झाले . “मंथन” संमेलन हे विणकर समाजाच्या उज्ज्वल भवि ष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरून सरकारच्या पाठिंब्याने भारतीय हातमाग उद्योगाला नवीन उंची प्राप्त होऊ शकेल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आदित्य जैन आणि निशी जैन हे आदित्य कँलेक्शन कन्हान व श्री अविद्या हँडलुम प्रोजेक्ट प्रोड्युसर कंपनी कन्हानचे संचालक नवीदिल्ली येथे आयोजित भव्य प्रजासत्ताक दिन परेड मध्ये सहभागी झाले होते. या ऐतिहासिक परेड ने देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आत्म निर्भर भारताचा संकल्प आणखी मजबुत केला. या प्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी “मंथन” बैठक अंतर्गत फलदायी चर्चा झाली. या बैठकीत भारतीय हातमाग उद्योगातील आव्हाने आणि शक्यता यावर सखोल चर्चा करण्यात आली.
ग्रामिण विणकरांसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे, सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जागतिक व्यासपीठावर भारतीय हातमागांचे सक्षमी करण या विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. श्री अविद्या हातमाग प्रकल्प उत्पादक कंपनीने विणकर समाजाच्या समस्या मंत्र्यांसमोर मांडुन त्या सोडविण्यासाठी ठोस धोरणात्मक पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मंत्री गिरीराज सिंह यांनी या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सरकार कडुन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
“मंथन” संमेलन हे विणकर समाजाच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. सरका रच्या पाठिंब्याने भारतीय हातमाग उद्योगाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे श्री अदिविद्या हँडलुम प्रकल्प प्रोड्युसर कंपनी कन्हान चे संचालक आदित्य जैन व निशी जैन हयानी आपले मनोगत व्यकत केले.