सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी आदासा सज्ज

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहकुटुंब करणार अथर्वशीर्षाचे पठण

नागपूर :- श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सोहळ्यासाठी श्री क्षेत्र आदासा सज्ज झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दि. २९ ऑक्टोबरला (रविवार) अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण होणार आहे.

ना. नितीन गडकरी स्वतः सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहणार असून भाविकांसोबत ते अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे पठन करतील. २९ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू होणार असून भाविकांनी सकाळी साडेसहापर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचणे अपेक्षित आहे. आयोजन समितीच्या वतीने नागपूर शहर व जिल्ह्यातील भाविकांना आमंत्रित करण्यात आले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून एका अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विविध समाजसेवी संस्था, संघटना, धार्मिक प्रतिष्ठानांसोबतच भाविक आपल्या कुटुंबासह या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. या कार्यक्रमाशी संबंधित माहितीसाठी मा. मंत्री महोदयांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष किंवा ०७१२-२२३९९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजन समितीने कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल यांना नव संशोधनासाठी पेटेंट

Fri Oct 27 , 2023
नागपूर :- महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल यांना स्टेटस मॉनिटरिंग अँपरेटस फॉर रिऍक्टर अँड ट्रान्सफॉर्मर (स्मार्ट) या विषयावरील नाविण्यपूर्ण संशोधनाला पेटेंट प्राप्त झाले असून यापूर्वी त्यांचा नाविण्यपूर्ण संशोधनाला भारत सरकारने पेटेंट प्राप्त झाले आहे. स्टेटस मॉनिटरिंग अँपरेटस फॉर रिऍक्टर अँड ट्रान्सफॉर्मर (स्मार्ट) या विषयावरचे नाविण्यपूर्ण संशोधन कार्यकारी अभियंता डॉ. गजानन जयस्वाल व विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफटेकनॉलॉजी येथील डॉ. मकरंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com