गोंदिया :- मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने एक्युप्रशर, वाईब्रेशन सुजोक ६ दिवसीय शिबीर नुकतेच पार पडले. नमाद महाविद्यालयात पार पडलेल्या या शिबिराचा लाभ दोन हजार पेक्षा अधिक विध्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला.
मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेद्र जैन, संचालक निखिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नमाद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात हे शिबीर घेण्यात आले. या शिबीरात एक्युप्रशर रिसर्च ट्रेनिंग आणि ट्रिटमेंट संस्थान जोधपूर (राजस्थान) चे तज्ञ उपस्थित होते. थेरेपिस्ट डॉ. भोमराज चौधरी, थेरेपिस्ट डॉ. प्रेम चौधरी, रघुराज चौधरी यांच्या चमुने ६ दिवस विद्यार्थी व प्राध्यापकांचे नैसर्गिक उपचार केले. सहा दिवसीय शिबिराचा २ हजारच्या पेक्षा जास्त विधार्थी, शिक्षक व गोंदियाच्या नागरिकांनी लाभ घेतला.
समारोपीय कार्यक्रमात गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेद्र जैन यांनी सांगितले की, नैसर्गिक चिकित्सेद्वारे औषधांपासून शरीराला दूर ठेवणे शक्य असून त्यामुळे शरीर निरोगी ठेवता येते. शरीर निरोगी करणारे हे एक्युप्रशर, वाईब्रेशन सुजोक शिबीर मनोहरभाई पटेल अकादमीच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येईल. यावेळी राजेद्र जैन, निखिल जैन यांच्या हस्ते डॉ. भोमराज चौधरी, डॉ. प्रेम चौधरी, श्री रघुराज चौधरी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रवीण कुमार यांनी तर आभार डॉ. भावेश जसानी यांनी मानले. सहा दिवसीय शिबिराच्या यशस्वीतेसाठी नमाद महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.