संदीप बलविर, प्रतिनिधी
तिसऱ्यांदा चूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा गुमास्ता रद्द
कचरा करणाऱ्या विरोधात नागराध्यक्षांनी काढला दंडाचा फतवा
बुटीबोरी नगरी स्वच्छ ठेवण्याकरिता नगराध्यक्षाचे नागरिकांना भावनिक आव्हान
नागपूर :- स्वछ, सुंदर बुटीबोरीचे स्वप्न उराशी बाळगून शहराला अधिक सुंदर बनविण्याकरिता नागरिकांनी,व्यापारांनी घन कचरा कचरा पेटीतच टाकावा व आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर ठेवावे असे भावनिक आवाहन बुटीबोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी बुटीबोरी वासीयांना केले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी औधोगिक वसाहत असलेल्या बुटीबोरी शहराला स्वच्छ सुंदर शहराच्या यादीत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी स्थानिक नगरपरिषद प्रशासन कसोशीने प्रयत्न करित आहे.त्याकरिता त्यांनी विविध स्वच्छतादूत निवडले असून शहरात स्वच्छता अभियान,होम मिनिस्टर, कचरा कुंड्या वितरण,इंडियन स्वच्छता लीग यासारखे उपक्रम राबवून शहराला कचरामुक्त स्वच्छ व सुंदर करण्यासाठी येथील प्रशासन प्रयत्न करीत असले तरी काही बेजबाबदार नागरिक,व्यापारी रस्त्यावरच कचरा टाकून स्वच्छ,सुंदर व स्मार्ट बुटीबोरी च्या स्वप्नांना खीळ लावत असल्याने,यावर कुठेतरी पायबंद घालण्यासाठी आता नगरपरिषद कचरा करणाऱ्यांवर कार्यवाही चा बडगा चालणार तर तिसऱ्यांदा चूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचा गुमास्ता रद्द करणार असल्याचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
स्वच्छ शहर,सुंदर शहर अशा घोषणा ऐकल्यानंतर समाधान वाटते.तसेच हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता व जनतेच्या समाधाना करिता नगरपरिषद स्वच्छता कर्मचारी सकाळी सहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता राबराब राबत असते परंतु संध्याकाळी मी स्वतः जेव्हा नगराची फेरफटका मारतो तेव्हा नगरच्या मुख्य बाजारपेठेत कचऱ्याचे ढिगारे साचलेले बघून स्वतःच्या स्वप्नांना कुठे तरी खीळ बसल्याचे बघून वाईट वाटत.जनतेने नगराला स्वच्छ,सुंदर बनविण्यासाठी माझे हाथ मजबूत करावे व नगरपरिषदेकडून शहराच्या विकासाकरिता सुरू असलेल्या योजनांत,कामात प्रत्यक्ष,अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करावे.
बुटीबोरीला स्मार्ट शहर बनविण्याचे स्वप्न बघणाऱ्या नगराध्यक्ष व प्रशासनासह येथील माणूस व युवा देखील स्मार्ट होईल का?असा प्रश्न रस्त्याने जातांना जागोजागी उपस्थित होतो.चौकात,रस्त्याच्या कडेला असलेल्या पान टपरीवर उभे राहून येथील युवा जेव्हा गुटख्याच्या पिचकाऱ्या व खर्याच्या पॉलिथिन रस्त्यावर फेकतात तेव्हा स्मार्ट शहराच्या स्वप्नांना तडा गेल्यागत वाटत म्हणून येथील युवांनी असे न करता कचरा डस्टबिनमध्येच टाकावा अशी सुद्धा कळकळीची विनंती यावेळी नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी केली.
यापूर्वी रस्त्यावर,रस्त्याकडेला कचरा फेकला तरी दंडाची तरतूद नव्हती .परंतु यानंतर दंडाची कार्यवाही केली जानार आहे.बुटीबोरी शहराला कचरामुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी विशेष पथकाची नेमणूक केली असून ते कचरा करणाऱ्यांवर व रस्त्यावर फेकणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवणार आहे.कचरा करणाऱ्यांची माहिती पुरविणाऱ्यांना योग्य बक्षीस सुद्धा देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.कचरामुक्त शहाराकरिता नगरपरिषदेकडून सार्वजनिक ठिकाणी शेकडो काचारापेट्या लावणार असून व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापारी प्रतिष्ठानात खाजगी कचरा पेठ्या लावाव्या.त्यानंतरही तिसऱ्यांदा प्रतिष्ठानसमोर कचरा आढळल्यास त्या व्यापाराचा गुमास्ता रद्द केल्या जाईल असा इशाराही गौतम यांनी दिला व भविष्यात बुटीबोरी शहर स्वच्छ व सुंदर होणाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.