नागपूर :- गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभागाने अधिकारी व अंमलदार यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत आवेडकर चौक येथील गबरू युनिसेक्स सलुन चे संचालक स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता महिलांना पैशाचे आमिष देवून त्यांचेकडून देहव्यापार करवून घेत आहेत. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, सापळा रचुन पंचांसमक्ष गवरू युनिसेक्स सलुन येथे रेड कारवाई केली असता, नमुद ठिकाणी आरोपी १) नितीन प्रकाश पवार, वय २६ वर्षे, रा. संजय गांधी नगर झोपडपट्टी, हुडकेश्वर, नागपुर २) निलम उर्फ निशा संजु बनोदे, वय ३५ वर्षे, रा. जुनी शुक्रवारी, सक्करदरा, नागपूर हे दोघेही स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता पिडीत महिलांना पैशाचे आमिष देवून, देह व्यापाराकरीता ग्राहकांकडून पैसे घेवुन, देहव्यापारास जागा उपलब्ध करून महिलांकडून देह व्यवसाय करवून घेतांना समक्ष मिळुन आले. आरोपींचे ताब्यातुन एका पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. आरोपींचे ताब्यातुन रोख ३,०००/- रू, तिन मोबाईल फोन, इतर साहित्य असा एकुण ५८,२५०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूध्द पोलीस ठाणे लकडगंज येथे कलम ४, ५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना मुद्देमालासह
पुढील कारवाईस्तव लकडगंज पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.. वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सह पोलीस आयुक्त, नागुपर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे),पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, मपोनि. कविता ईसारकर व पथकातील अधिकारी अंमलदार यांनी केली.
– फाईल फोटो