कुही :- दिनांक २०/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन कुही परीसरात पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, पाचगाव फाटा येथे अवैध रित्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशी माहिती मुखवीरद्वारे मिळाल्याने नमुद घटनास्थळावर नाकाबंदी केली असता १) टिप्पर क्र. MH40 CM 6276 २) टिप्पर क्र. MH40 CD 6276 येतांनी दिसले. टुकचा चालकाला थांबवून तपासले असता सदर वाहनात आरोपी नामे- १) नितेश मालोडे वय ३० वर्ष, रा. निलज ता. पवनि २) विशाल मोहोडकर, वय ३० वर्ष, रा. घुरखेडा ता. उमरेड हे रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून १) टिप्पर क्र. MH40 CM 6276 २) टिप्पर क्र. MH40 CD 6276 प्रत्येकी २०,०००००/- प्रमाणे एकूण ४०,००००० /- रु ट्रक मध्ये असलेली १६ ब्रास रेती प्रत्येकी ६०००/- रु ब्रास एकूण किंमती ९६००० /- असा एकूण ४०९६००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रियेकरीता पोलीस ठाणे कुही दुरक्षेत्र पाचगाव चौकी यांचे ताब्यात देण्यात आले. सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोहवा मयुर ढेकळे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे.कुही येथे आरोपीताविरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोदार (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, अरविंद भगत, मयूर ढेकले, मिलिंद नांदूरकर, पोलीस अंमलदार राकेश तालेवार यांचे पथकाने केली.