अवैधरित्या जनावरांना निर्दयतेने वाहुन नेणा-या आरोपीवर कारवाई ९ गोवंशांना मिळालेले जिवनदान, एकूण ६,३५,०००/- रू चा माल जप्त

– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई

नागपूर :- पो. स्टे. मौदा हद्दीत स्टाफसह अवैध गोवंश वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना मौजा पावडदोना शिवारात लहान मालवाहू चारचाकी वाहन क्र. MH-३०-DD३८५५ मधून अवैध रित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मौजा पावडदोना शिवारात नमूद वाहणाला पकडून पाहणी केली असता वाहन क्र. MH-३०-DD -३८५५ मध्ये ०९ गोवंशिय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून, आखूड दोरखंडा ने बांधुन व जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करतां कत्तली करिता घेऊन जातांना मिळून आल्याने वाहन बालक यास ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून ०९ गोवंशिय जनावरे प्रत्येकी १५०००/- प्रमाणे १,३५,०००/- रू व मालवाहू वाहन ५,००,०००/- रु. असा एकूण ६,३५,०००/- रू. चा माल जप्त करण्यात आला असून सदर वाहना मधील गोवंशिय जनावरांना योग्य व्यवस्थापनार्थ गोरक्षण केंद्र भंडारा येथे दाखल करून आरोपीता विरुद्ध कलम ११(१) (ड) प्रा. छळ प्रति. अधि. १९६० सहकलम ५ अ (१),९ महा. प्रा. सं. अधि. १९७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलीस निरीक्षक  सतीशसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक निलेश डोर्लिकर, पोलीस हवालदार अनिल कोकोडे, पोलीस अंमलदार सचिन हटवार, प्रदीप खिल्लारे, अतुल निंबरते. शुभम ईश्वरकर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई वाहनासह एकूण ३,५४,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Mon Apr 1 , 2024
खापरखेडा :- पोस्टे खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, विना संगम येथे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक होत आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून नाकाबंदी करून आरोपी नामे आकाश मारुती चौधरी, वय ३० वर्ष, रा. बिना संगम हा आपल्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्र. MH 40 BL 9660 ने अवैधरीत्या चोरटी रेतीची वाहतुक करतांनी मिळुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com