अवैधरित्या जनावरांना कत्तलीकरीता वाहतुक करणा-या आरोपीविरूध्द कारवाई ६ गोवंशसह एकूण ६,१०,०००/- रू चा माल जप्त

– स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पारशिवनी :-दिनांक १४.०१.२०२४ रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी परीसरात स्टॉफसह पेट्रालिंग करीत असता एका गोपनिय माहीतगाराकडुन मिळालेल्या माहीती वरून एका सिल्वर रंगाची इनोव्हा वाहन क एम एच ४० के आर ६५७७ या वाहनात अवैध रित्या गोवंश जनावरे यांना नायलॉन दोरीने बांधुन निदर्यतेने वागणुक देवुन, त्यांना चारा पाणी न देता कत्तली करीता घेवुन जात असतांना पारशिवनी शिवार आमडी पुलियाचे जवळ नाकाबंदी केली असता एक इनोव्हा वाहनाचा चालक सदर वाहन सोडुन पळुन गेला. त्याचे ताब्यातील वाहन चेक केले असता त्यामध्ये एकुण ६ गोवंश जनावरे व कारवड मिळुनआले.

नाव आरोपी :- एम एच ४० आर के ६५७७ चा चालक आरोपी फरार

जप्त मालाचे विवरण:-१. एकुण ६ गोवंश (गाई), बैल, कारवट, एकुण कि १,१०,०००/-

२. इनोव्हा कार क एम एच ४० आर के ६५७७ कि ५,००,०००/-रू असा एकुण ६,१०,०००/- रू चा माल.

सदर जप्ती मुद्देमाल व फरार आरोपी चालकाचे विरुष्द पोलीस स्टेशन पारशिवनी येथे कलम ११(१)ड, प्राणि संरक्षण कायदा ५(१) (ए) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा सहकलम १८४ मोटर वाहन कायदा अन्वयें गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई हर्ष ए.पोहार (भा.पो.से.), पोलीस अधिश्वक, नागपुर ग्रामीण व अपर पोलीस अधिक्षक डॉ संदीप पखाले यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली, पोहवा रोशन काळे, नितेश पिपरोदे, भोला मडावी, पोना विरेंद्र नरड यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

5 दिवसीय विराट भक्ति सत्संग 17 जनवरी से 

Mon Jan 15 , 2024
– गुरु दर्शन के लिए दूर-दूर से आएंगे भक्त – श्री राम प्राण प्रतिष्ठा पर बन रहा भव्य ‘रामधाम’ नागपुर :-विश्व जागृति मिशन नागपुर मंडल के तत्वावधान में आचार्य सुधांशु महाराज के सानिध्य में 5 दिवसीय विराट भक्ति सत्संग समारोह का आयोजन ‘रामधाम’ रेशिमबाग मैदान में 17 से 21 जनवरी तक किया गया है। मिशन के महामंत्री दिलीप मुरारका ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com