पोलीस स्टेशन कुही हद्दीत दारू तस्करावर धडक कारवाई

कुही :- पोलीस स्टेशन कुही हद्दीतील नाफेगडी परीसरात दारूची अवैध वाहतुक होत असल्याचे गोपनिय माहीती कुही पोलीसांना मिळाल्याने दिनांक ०६.०६.२०२४ रोजी रात्री २१.३६ वा पोस्टे कुही येथील अधिकारी व स्टाफसह वरीष्ठांना माहीती देवुन दिपक अग्रवाल (भापोसे) पोलीस निरीक्षक कुही यांचे नेतृत्वात चाफेगडी शिवारात जावुन पेट्रोलिंग करीत असता एक इसम नामे राजकुमार गरीवा बिरवल हा आपले मोटर सायकलने येतांना दिसला. त्याचे मोटर सायकल वर एक पांढ-या रंगाची प्लास्टीक चुंगडी दिसली. त्याची झडती घेतली असता प्लास्टीक चुंगडीमध्ये प्रिमीयम नं १ ची ९० एम एल चे २०० निपा व काळया निळ्या रंगाचे दोन कापडी पिशवीमध्ये प्रिमीयम नं १ १०८ एम एल ९६ निपा मिळुन आले. करीता मो साक एम एच ४९ वि ई १९५५ कि ७०,०००/- रू व ९० एम एल चे २०० निपा कि ७०००/- रू व १८० एमएल चे ९६ निपा कि ६७२० रू असा एकुण कि ८३७२०रू चा मुद्देमाल जप्त करून पोस्टे कुही येथे दारूबंदी काय‌द्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, रमेश चुमाळ अपर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक अग्रवाल (भापोसे), पोलीस उपनिरीक्षक हरीहर सोनकुसरे पो. हवा चांगदेव कुथे पोलीस अंमलदार रविंद्र मारबते, आशिष खंडाईत यांचे पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अठ्ठल मोटार सायकल चोरट्यास बु‌ट्टीबोरी पोलीसांनी केले जेरबंद

Sat Jun 8 , 2024
बु‌ट्टीबोरी :- फिर्यादी नामे कैलास दिलीपराव भूते, वय ३४ वर्ष, रा. प्लॉट नं. १४ टिपले ले आऊट लांबट लॉन जवळ खरबी ता. जि. नागपुर हे दि. २४/०५/२४ रोजी १९/०० वा. दरम्याण मित्र आदित्य खोब्रागडे याचा वाढदिवस असल्याने स्वताची होंडा अॅक्टीव्हा मोपेड क. एम एच ४९ बीएच ९५४८ किमती ५०,०००/- रु. ने बुटीबोरी येथे आला होता वाढदिवस आटोपल्यावर जेवन झाल्यावर मित्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com